पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय चळवळ. मग मारे - अंधार असला तर दिवा लाव, जागा झाडून काढ, बाहेर पाऊल टाकावयाचें तर आठवणीनें जोडा घाल, जरा कोठें खट्ट झालें तर न जाणों तो सुटून गेलेला साप आला की काय असा ध्यास असतो. मोठी हिंमत करून निर्भयपणानें व्यवहार तर चाललेले असतात, कोणी कांहीं घर सोडून जात नाही, परंतु अंतःकरणांत त्या सापाची स्मृति सर्व व्यवहारास व्यापून असते, व व्यवहार त्या स्मृतीला धरून विशेष तऱ्हेनें चालतात. आस्तिक मनुष्याची स्थिति सामान्यतः अशी असते. व अशी ज्याची ईश्वराच्या अस्तित्वाची भावना, त्याच्या व्यवहारास व्यापून असेल, तोच खरा आस्तिक, बाकांचे कितीही पंडित असले तरी, नास्तिकच. ७० असा आस्तिक मनुष्य म्हटला म्हणजे ईशतवाशीं गांठ घालणारा, अशीच कांहीं मोठी समजूत करून घेण्याचें कारण नाहीं. ही एक मधली पायरी आहे. त्याचे सर्व व्यवहार सुटलेले असतात, अगर चित्तशुद्धि वगैरेच्या दृष्टीने त्याने पूर्णता संपादिलेली असते, अथवा त्याच्या ठिकाणीं, इतर माणसांच्या ठिकाणी आढळून येणारा दुर्बळपणा व प्रवृत्ति नसतात, असें नाहीं. परंतु इतर लोकांत आणि त्याच्यामधे एवढाच फरक राहतो की, इतर लोकांची आस्तिक्यबुद्धि लाभ हानि इत्यादि प्रसंगी जागृत होते, आणि इतर व्यवहारांत घोरत पडलेल्या माणसाप्रमाणे असून अडचण नसून खोळंबा,' अशा त-हेची असते. तीच या माणसाच्या ठिकाणी को- णच्याही काळी आणि कसल्याही व्यवहारांत जागृत उभी असते, त्यामुळे त्याच्या मनांत असो नसो, त्याचे सारे व्यवहार तिच्या धोरणानेंच घडतात. यामुळे दोघांच्या सर्व कृति व त्या कृतींच्या परिणामांत जमीनअस्मानाचें अंतर पडतें. निदान एवढी आस्तिक्यबुद्धि तरी जागृत झाली पाहिजे आणि तशी ती जागृत होऊन मनुष्य आपले व्यवहार करूं लागणे म्हणजेच धार्मिक जीव- नास खरोखर प्रारंभ होणें आहे, अशा तऱ्हेची बुद्धि नसल्यामुळे, एका बाजूनें धर्माचें सूक्त गात असतांच, राष्ट्र नास्तिकपणांत बुडून गेले आहे. ही स्थिति जाऊन आस्तिकपणा येईल आणि देशांतील अनेक धर्मपंथांना नवीन चालना मिळेल तेव्हां स्वातंत्र्याच्या खटपटी करण्यास राष्ट्र तयार होईल. तोपर्यंत उदंड खटपटी केल्या तरी त्यांना यश येणार नाही. असे त्यांचे ठाम मत होतें. देशाचें स्वातंत्र्य बाँब आणि बंदुका यांच्याकरितां अडून राहिले नाहीं, आणि