पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ असतो, परंतु तो त्यांच्या सर्व कृतींना व्यापून नसतो. एक वेगळ्या तऱ्हेचें उदाहरण घेऊन सांगावयाचे म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणांतील भीतिसारखें हे आहे. सामान्यतः भीति हा अंतःकरणाचा धर्म सर्वच ठिकाणी असतो, आणि माणसांना घरांत राहण्यासारख्या यःकश्चित् गोष्टीपासूनही ' सर्प म्हणती माझे घर । विंचू म्हणती माझे घर' अशा अनुभवानें- ' भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे' असे प्रतीत होत असते. परंतु ही भीति त्यांच्या कोणच्याही व्यवहारास, अगर व्यवहारांत त्यांच्या अंतःकरणांत व्यापून नसते. शेजारींच बीक आहे हे ठाऊक असतें, तरी तेथेंच तो अंथरूण घालून बेगुमानपणानें घोरत पडतो. परंतु एखादे दिवशीं ज्यावेळी साप अगर प्रत्यक्ष विंचू भेटीस येतात, तेव्हां कांहीं काळ, त्यांच्या सर्व व्यवहारांत त्या सर्प विंचवांची स्मृति जागृत असते. 6 माझ्या जोड्याकडे पाहूं नको ! ' त्यानें केव्हां उडवून दिली असती. परंतु अण्णासाहेवाविषयीं तसें करण्यास मन घेईना. क्षणमात्र तो मोठ्याच विचारांत पडला. एकीकडे असल्या आपत्तीत पडलेला लाल चेहयाचा गव्हर्नर, व दुसरीकडे शांत गंभीरपणानें स्मितपूर्वक त्याचेकडे पहात असलेली अण्णासाहेबांची मूर्तेि, आणि आतां काय होतें कोण जाणे, म्हणून उर्ध्वश्वासानें अवलोकन करणारी तटस्थ सभा, असा क्षणमात्र भारतीय देखावा दिसला शिष्टाई करण्यास उभे असलेले भगवान् श्रीकृष्ण, आणि त्यांना कैद करण्याचा हुकूम देऊन सभा सोडणारा दुर्योधन, व भोंवतालचे सभासद यांचाही असाच देखावा एकाद्या संजयास दिसला असेल, परंतु सुदैवानें परिणाम मात्र तसा न होतां, म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष नौरोजी पदमजी यांच्या प्रसंगावधानानें वेळ निभून गेली. त्यांच्याकडे निमंत्रित पाहुण्याचा परिचय करून देण्याचें काम होतें. त्यांनीं चटकन् पुढे होऊन Mr. Vinayk Ramchandra Patwardhan, rather an orthodox Brahman, असे म्हटले, त्याबरोबर साराच मनु पालटला व सारा राग गिळून टाकून जणूं कांहीं या टीकेनें मौज वाटल्यासारखे करून क्लार्क साहेबानें हंसत हंसत हस्तांदोलन केलें । त्या प्रसंगाचें वर्णन करतांना त्या Orthodox शब्दाची अण्णासाहेब स्वत: मौज करीत असत, व “ Orthodox नाही तर आणखी कांहीं खुशाल म्हण पण माझ्या जोड्या- कडे पाहूं नको. " अर्से विनोदानें म्हणत असत. ०