पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सल्ला देण्याची तन्हा. ७१ वेळ आली म्हणजे त्यांच्याकरितां कोठें जावेंही लागावयाचें नाहीं, देशांत हत्यारें आहेत ती आपलींच आहेत, असे ते नेहमी म्हणत. अडून राहिलें आहे तें राष्ट्रांतील व्यक्तींच्या निःसत्त्वतेमुळे. " राष्ट्रीय चळवळीच्या लाटेंत सांपडलेले कित्येक तरुण केव्हां केव्हां त्यांना सल्ला विचारावयास येत असत. त्यांसही ते उघड उघड असेच सांगत असत. देशसेवेच्या मार्गास लागण्यास हरकत नाही, परंतु आधीं भगवंताचे अधिष्टान पाहिजे' एवढे लक्षांत ठेव, त्याच्या खेरीज कांही प्राप्त होणार नाहीं. आणि तें जर होत नसेल तर यांत पडूं नका, असा उघड उघड सल्ला ते देत. कित्येक वेळां त्यांची सल्ला भित्रे- पणाची व चमत्कारिक देखील वाटे. परंतु बेजबाबदारपणानें स्वतःचा विश्वास नसतां, तरुण मुलांचीं आयुष्यें निरर्थक बळी देऊन स्वतःचा पुढारीपणा त्यांनी कायम ठेवला नाहीं. एकदां एका राजकीय खट- ल्यांत सांपडलेला तरुण त्यांच्याकडे आला, आणि आपण पोलिसांत काय जबाब द्यावा, म्हणून विचारूं लागला. यांचा सर्व जन्म वकीलीचा धंदा करण्यांतच गेला होता, तरी पण 'तूं खोटें बोल,' असे कोणासही सांगणें त्यांना शक्य नव्हते. त्यांनी त्याला सरळ असे सांगितले की 'एक तर काय वाटेल तें झालें तरी, आपणास कांहींच सांगावयाचें नाहीं' म्हणून तोंडांतून एक अक्षरही काहूं नकोस, त्यांत कांहीं वाईट नाही, कारण, कोणत्याही गोष्टीविषयी बोलणे किंवा न बोलणें हा ज्याच्या त्याच्या खुषीचा प्रश्न आहे. साक्ष न दिल्यास सरकार तुरुंगांत घालतें, परंतु त्यांत कांही अनीति होत नाही. मात्र बोला- वयाचेंच असल्यास खोटें बोलूं नकोस, सरळ सांगून मोकळा हो. १९१४ साली लोकमान्य परत आल्यावर कांही वेळ त्यांच्या दारावर पहारा ठेवला असून आंत जाणाऱ्यांची पोलीस नोंद करीत असे. अशा वेळीं खानदेशांतील कुकरमुंड्याचे भगवद्भक्त संतोजीबुवा हे पुण्यास आले असतां त्यांच्या निर- भिमान वृत्तीस अनुसरून त्यांना लोकमान्यासारख्या राष्ट्रपुरुषाचें दर्शन घ्यावें अशी इच्छा झाली. परंतु लोकमान्यांच्या घरावर असलेली पोलीसची देखरेख पाहून त्यांना थोडा विचार पडला. तेव्हां त्यांनी अण्णासाहेब यांस सल्ला विचा- रला. अण्णासाहेबांनी 'आपण जाऊं नका,' असे स्पष्ट सांगितलेले ऐकून सर्व लोकांस आश्चर्य वाटलें. तेव्हां 'अण्णांचें अन्न' करणारे सुप्रसिद्ध डॉ. हरी-