पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ राष्ट्रीय चळवळ. राष्ट्रांतील जाणत्या लोकांनी स्वतः होऊन आपले स्वतःचे आयुष्यास वळण दिल्याखेरीज, आणि आपणांवर अवलंवून असणाऱ्या लोकांस तसे वळण पचनी पडेल अशा रीतीनें पके लावल्याखेरीज कार्यभाग व्हावयाचा नाही, असा त्यांचा सिद्धांत होता. असे करण्याचे मार्ग कोणचेही असोत, त्याचा वाद नव्हता परंतु त्यांचा स्वतःचा धर्मावर विश्वास असल्यामुळे धर्माच्या साहाय्यानेंच हैं. घडणे शक्य आहे असे ते म्हणत; परंतु धर्माविषयी त्यांची कल्पना मात्र पूर्वी सांगितल्याप्रमाणे संदिग्ध नसून निश्चित होती. धार्मिक जीवनास प्रारंभ व्हावा म्हणून परसेवादि गुण तर हवेतच, परंतु ईश्वराच्या अस्तित्वांतील जिवंत विश्वास हाच धार्मिक जीवनांचा प्रारंभ आहे, असे त्यांचें स्पष्ट मत होतें. श्रीसमर्थांनी म्हटल्याप्रमाणे ' देवा वेगळें कोणी नाहीं' । असें सर्वही बोलतात, परंतु खरोखर त्यांची “ श्रद्धा कांहीं । तैसीच नसे ॥ " ही स्थिति जाऊन ईश्वराच्या अस्तित्वावर खरोखर विश्वास उत्पन्न झाल्याखेरीज तरणो- पाय नाहीं. ईश्वराच्या अस्तित्वावर एक प्रकारचा विश्वास तर बहुतेकांचा जाऊन बसले. जित लोकांच्या शिष्टसांप्रदायाप्रमाणे साहेब बहादुरास भेटतांना एक तर त्यांचा बूट घालून जावें अथवा कांहीही न घालतां उघड्या पायांनी जावें, ही रीत प्रसिद्धच आहे. तेव्हां मोठाच प्रश्न येऊन पडला. भेटीपुरता तेथल्या तेथें जोडा काढून ठेवणें हें अण्णासाहेब यांस अपमानास्पद होतें. व जोड्यासुद्धां भेटणें, हें गव्हर्नर साहेबांचा उपमर्द करण्यासारखे होतें. आणि गव्हर्नर तर सर जॉर्ज क्लार्क अशा स्थितीत आतां काय होते, अशी सर्वांस चिंता पडली, व कित्येक लोकांस मनापासून आनंदही झाला. स्वतः अण्णा- साहेब यांस चिंता म्हणजे काय पदार्थ आहे हे माहीतच नसल्यामुळे ते मात्र नेहमीप्रमाणेच शांत गंभीर होते. त्यांचा उल्लेख होतांच तसेच ते डायसवर गेले. आणि त्यांच्या पायांतील जोडा पाहून सर जॉर्ज क्लार्कच्याही कपाळांत तिडीक उठली. तो प्रसंगच मोठा विचित्र होता. जोड्याकडे दुर्लक्ष करावें, तर स्वतःच अपमान होतो, व त्याचा इनकार करावा तर जोडा घालणारी व्यक्ति कोणीतरी अशी तशी नसून प्रत्यक्ष अण्णासाहेबच ! तेव्हां काय करावें, ही सर क्लार्कलाही मोठीच पंचाईत पडली. इतर कोणी व्यक्ति असती तर