Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ राष्ट्रीय चळवळ. शयोक्ति देखील नाही, असेच बहुतेकांच्या अंतःकरणास कवूल करावें लागेल. सारांश काय कीं, जोपर्यंत राष्ट्रघटकांची अशी अवस्था कायम आहे, तोपर्यंत नुसत्या उत्तमोत्तम तत्त्वांवर काढलेल्या चळवळींनी कांहीही व्हावयाचें नाहीं. अथवा कांहीं थोडें कार्य होतेंच म्हटले तर तें इतकें अल्प होईल की त्याच्या- योगानें उद्दिष्ट हेतु कधीही साधणार नाहीं, धर्माचा आणि राष्ट्रीय व राजकीय चळवळींचा काय संबंध असाबा हा एक आजकाल मोठाच वादाचा प्रश्न होऊन बसला आहे. तो सोडून दिला तरी निरनिराळ्या लोकांचे विचार, त्यांचे प्रयत्न आणि उत्पन्न होणारे सर्व तऱ्हेचे वाङ्मय यांचे धोरण पाहिलें, तर असे दिसून येतें कीं, माणसामाणसांत बंधुभावाचे संवर्धन आणि तत्प्रीत्यर्थ स्वार्थत्यागाची सीमा व परसेवा या मह- च्वांची आवश्यकता भासूं लागली आहे, आणि कल्पनेनें कां होईना, त्यांच्या सर्व तऱ्हेच्या सीमा व नमुने अनुभविण्यांत मौज व आनंद वाटतो. मग ती धर्ममूलक असीत, अथवा कशीही असोत. व सर्वसाधारण प्रवृत्ति पाहिली, तर यांसच अतिमानुष उन्नति समजण्यांत येते, आणि हें पाहून समाजाच्या वस्तुस्थितीची त्यांना फार कॉव येत असे. खर्चाच्या विजयानें सवाई माधवरावाच्या डोळ्यां- तून ज्याप्रमाणें पाणी आलें, त्याचप्रमाणे त्यांनाही वस्तुतः मनुष्य म्हणून ज्या गोष्टी माणसाजवळ असावयास पाहिजेत, त्याच गोष्टींचें मोठें प्राप्तव्य म्हणून माजविलेले एवढें स्तोम पाहून वाईट वाटे. समाजाच्या स्थितीचा प्रश्न निघाला असतां अंतःकरणास दुःख होऊन " शेजारचा माणूस जेवला आहे कीं, उपाशी आहे, याची देखील कोणी चौकशी करीत नाहीं रे!" म्हणून ते वारंवार म्हणत असत. याचा अर्थ असा कीं, वर सांतितलेले परसेवा, त्याग, वंधुभाव वगैरे गुण यांतच मनुष्यत्व आहे; आणि जेथे पूर्वोक्त षाड्गुण्याचें साम्राज्य होऊन, याच तत्त्वांना अंतिम उन्नति समजण्यांत येते, तेथें मनुष्य- त्वाचा अत्यंत व्हास झाला आहे हे उघड आहे. त्यांच्या दृष्टीनें मनुष्यानें मनुष्याची सेवा करावी, बंधुभाव वाळगावा असे वैदिक राष्ट्रास सांगावयाची पाळी यावी, म्हणजे माणसांनी दोन पायांवरच चालावें, असा नियम शिक- विण्याइतकें विचित्र होतें; परंतु तशी पाळी येऊन पोहोंचली आहे, याचा त्यांना अत्यंत खेद होई, आणि जोपर्यंत ही स्थिति पालटून वैदिक लोकांचें मनुष्यत्व त्यांच्यांत आले नाही, तोपर्यंत त्यांच्यानें कोणचीही