पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्वाचीन षड्गुणैश्वर्य. ६३ असतात, म्हणून ते त्यांचे मोठे गमतीदार वर्णन करीत असत. भरल्या पोटा- वर केवळ 'घरची'च्या आग्रहाकरितां दोन पोळ्या जास्त खाऊन, दुष्काळ फंडा- करतां व्याख्यान देणारे अगर त्या दुष्काळपीडित लोकांच्या अन्नान्न दशेचें आणि हिंदुस्थानच्या पारतंत्र्याचे मोठे सुरस वर्णन करून लोकांच्या डोळ्यांतून पाणी काढल्यावर आणि स्वतःचें उपरणे ओलें चिंब केल्यावर घरचीला 'अगे, जरा साखरेचा शिरा तर भाज, आज बरेंच बोलावे लागलें,' म्हणून सांगणारे हे देशभक्त, देशाकरतां वाटेल ती गोष्ट करावयास तयार असतात, फक्त त्यांची एकच अट असतेः – पदराला खार नको, अंगाला ओरखडा नको, दहाव्या घंटेचा वरणभात चुकावयास नको, बाकी काय हवें तें सांगा, मी करायला एका पायावर तयार आहे,' असे या लोकांचे ते विनोदी वर्णन करीत असत. साठ वर्षांच्या अनुभवानें महाराष्ट्रांतील वहुजनसमाजाविषयीं जो त्यांना अनुभव आला व त्यामुळे त्यांचें जें मत झाले, त्याचा निष्कर्ष एके ठिकाणी लिहिलेला आढळतो, तो असाः - श्री २८-१-१९०८ १. मी ( आपण ) च सबंध शहाणा, बाकी सर्व मिळून अर्धा किंवा, निमशहाणा; एवं जगांत दीड शहाणा म्हणून एकी अशक्य.

  • २.

सर्व जो विचार करणे किंवा हित पाहणें तें आपल्या साडेतीन हात देहापुरतें; दुसरा मरेना; आपल्या पोळीवर तूप ओढणें, ३. विश्वास ठेवला. ( दुसऱ्यावर ) विश्वास ठेवावा व झक मारावी, किंवा झक मारली, पदराला खार नको. अंगाला ओरखडा नको. ६. दहाव्या घंटेचा वरणभात चुकावयास नको. चळवळ करणाऱ्या लोकांसंबंधीच्या या मतावरून त्यांच्या चळवळी विषयीं- च्या मताचें निदर्शन होतें, आणि सर्व प्रकारच्या चळवळीचा तटस्थपणानें जर आढावा काढला, तर तें मुळींच चूक नाहीं, इतकेच नव्हे, तर त्यांत अति-

  • कापल्या करंगळीवर मुतावयास नको, देवाण घेवाण शिवाय नको, जे

हें स्वार्थ. प्रेम= निरपेक्ष काम=ज्यांत बदला नाहीं.