Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा गांधीची चळवळ. गोष्ट होणें दुरापास्त आहे, असे ते म्हणत. १९०८ सालीं मे महिन्यांत रा. अ. व. कोल्हटकर हे धुळ्यास आले असतां त्यांच्या वर्तमानपत्राच्या ' देश- सेवक' या नांवावर गमताने टीका करून " कसले रे तुम्हीं देशसेवक ? खरोखर तुम्हीं ‘ कोडगे' सेवकच आहां " असे म्हणून त्यांनी पूर्वोक्त षाड्- गुण्याचें व मनुष्यामनुष्यांतील या दूरीभवनाचे वर्णन करून, 'जॉपर्यंत ही स्थिति पालटली नाही, तोपर्यंत नुसत्या राजकीय चळवळीनें कांहीं व्हावयाचें नाहीं, ' असे स्पष्ट सांगितले होते. त्यांच्या असल्या एकंदर सांगण्याचा सारांश असा दिसतो कीं, राष्ट्रीय अस्तित्व आणि राजकीय अस्तित्व या दोन गोष्टी जरी परस्पराश्रयी असल्या, तरी त्या अगदी भिन्न आहेत, व त्यांचा संकर हा दोघांनाही मारक आहे; आणि हल्लांच्या सारख्या परिस्थितीत राष्ट्रीय चळवळींची जास्त आवश्यकता आहे. राजकीय चळवळीचा आणि राष्ट्रीय चळ- वळीचा संकर करून, राजकीय फायदा तर कांहीं एक पदरांत न वेतां, किंवा खरें म्हणावयाचे तर घेण्याची ताकद नसतां, राष्ट्रीय चळवळी माल फुकट मारून टाकणाऱ्या शहाणपणास काय म्हणावें, ते त्यांस समजत नसे. झाडा- खाली झाड वाढत नाहीं, हें तर उघडच आहे. त्याचप्रमाणे परकीय सत्ते- खालीं राष्ट्रीयत्वाची वाढ होणें, आणि राष्ट्रीय चळवळी पोसल्या जाणे, ही गोष्ट अत्यंत दुर्घट आहे. अशा स्थितींत राजनीतीच्या कौटिल्यामुळेच कां होईना, तसें होण्याचा जो कांहीं थोडाबहुत संभव आहे, तो देखील अशा रीतीनें वाया घालविल्याबद्दल त्यांस वाईट वाटे. आपले मूळचें तत्त्व*

  • राष्ट्रनेते महात्मा गांधी यांनी लो. टिळकांच्या प्रयाणाची संधी साधून

त्याच मुहूर्तावर सुरू केलेल्या जोरदार चळवळीचा मूळ पाया खरोखरच चांगला होता. त्यांचा सत्यागृहाश्रम, स्वतःचे वर्तन, त्यावेळचे लेख, आणि विशेषतः मद्रास येथील व्याख्यानें, आणि त्यांच्या चळवळीनें, वाणीने आणि मतांनीं निरनिराळे धारण केलेले अवतार, या सर्वांचा निष्कर्ष थोडक्यांत असा सांगतां येईल कीं, म. गांधींनी आपली चळवळ दुधारी तलवारीसारखी मुळापासूनच दोन अंगांनी सुरू केली. आमच्या वरील लेखनपद्धतीप्रमाणे म्हणावयाचें म्हणजे सुरू करतांना राष्ट्रीय आणि राजकीय अशा तिच्या दोन स्वतंत्र बाजू खं, ३...५