पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ राष्ट्रीय चळवळ. · काम आहे. हल्लींच्या बहुतेक राष्ट्रीय म्हणविणाऱ्या चळवळी अशा तऱ्हेच्या नसल्यामुळे विनपायाच्या घराप्रमाणे एवढासा वारा आला की कोलमडून जातात. या सर्व प्रकारच्या चळवळींना प्रोत्साहन देऊन पाया शुद्ध करण्याचा ते आपल्याकडून प्रयत्न करीत, आणि तेवढ्याकरतां जो कोणी मागेल ती मदत देण्यास तयार असत; परंतु त्याचवरोवर त्यांतील सर्व कार्यकारी लोकांचे धोरण पाहून त्यांना त्या चळवळीचें हसू येई. " होमरूल लीग ' ज्या वेळेस स्थापन झाली त्या वेळेस ती बातमी श्री. दादासाहेब खापर्डे यांनी आळंदीस मोटारीतून जाऊन अण्णासाहेबास कळविली. त्या लीगमध्ये अर्थातच अण्णासाहेब यांचेही नांव होते त्यावरून मी त्यांना विचारले कीं, ' ही लीग म्हणण्याजोगतें कांहीं काम खरोखर करील असें तुम्हांला वाटतें काय' ? तेव्हां मनापासून हंसूं येऊन त्यांनी सांगितले की सर्व चांगल्या प्रयत्नास मदत करणें हैं काम आहे, कालानुरूप शक्य तो प्रयत्न केला पाहिजे म्हणूनच या चळवळी करावयाच्या व थोडा फार फायदा त्यांचेकडून होतोच. परंतु या चळवळी केवळ राजकीय असतात असल्या ‘ लीगां'नी काय व्हावयाचें ? मला स्वतःला त्यांत कांहींच अर्थ दिसत नाही.' त्यावर बोलणे निघून त्यांनी सांगितले की, " आजकाल जो तो 'सामर्थ्य आहे चळवळीचें ' ही समर्थांची ओळ घोकतो, परंतु 'आधी भगवंताचें अधिष्ठाथ पाहिजे. ' या दुसऱ्या अर्थाकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. परंतु जर चळवळीचें सामर्थ्य दिसावयाचें असेल तर आर्धी दुसऱ्या अर्थाचाच विचार केला पाहिजे. " शस्त्र कितीही उत्तम असले तरी त्याची करामत शस्त्र वाहणाऱ्या हातावरच • अवलंबून असते, त्याचप्रमाणें चळवळ कितीही चांगल्या तत्त्वावर निघालेली असो, तिचॆं कार्य कार्यकर्ते म्हणविणा-या लोकांवरच अवलंबून असतें. महाराष्ट्रां- 'तील सर्व चळवळीविषयी जे त्यांचें एकजात अनुकूल मत नव्हते त्याचे कारण तरी त्या चळवळी मोठ्या सदोष होत्या असे नव्हे; तर चळवळ करणाऱ्या लोकांविषयींच त्यांचें मत अनुकूल नव्हतें. लो. टिळक अगर रा. ब. ग. व्यं. जोशी यांच्यासारखी माणसें वगळली तर महाराष्ट्रांतील देशमक्तां- बद्दल त्यांचा ग्रह वाईटच होता, असे म्हटले तरी चालेल. पृथ्वीचा उद्धार करण्याकरतां परमेश्वर षड्गुणैश्वर्यसंपन्न रूप धारण करतो, त्याप्रमाणे देशो- द्धारार्थ कमरा बांधलेल्या या देशभक्तांच्या करुणमूर्तीही (1) षड्गुणसंपन्न