पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुम्ही मवाळ की जाहल ? ६६ असला पाहिजे. हाच अर्थ जास्त चांगल्या रीतीनें वरील ओवींत व्यक्त केला आहे. तिच्यांतील ईश्वराचें अधिष्ठान म्हणजे प्रत्येक कार्यारंभी अथवा कार्यंत कुळधर्माप्रमाणें अनुष्ठान करणें, असाच केवळ खास नाहीं. कारण तसे असतें तर ग्वालेरीचा किल्ला ताब्यांत आल्याचशेवर शिंद्यांची गंगाजळी फोडून सहस्रशः समाराधना करणारे तात्या टोपी व रावसाहेब यांस अपयश कधींच आले नसतें. ईश्वराचें अधिष्ठान जेथें असतें, तेथे जी देवी संपत्ती सहज वास करते, ती देवी संपत्ती आणि ईश्वरीकृपेने येणारे सर्व प्रकारचें अमानुष धैर्य ही स जेथें असतील, तेथें सर्व प्रकारच्या चळवळी उत्तम रीतीनें वाढून यशस्वी होतात असा त्यांतील भावार्थ आहे. म्हणून चळवळीचें सामर्थ्य प्रतीत होण्याकरितां मुळांत ईश्वराचें अधिष्ठान होईल, असेंच अनुष्टान प्रथमतः केले पाहिजे. मग त्याचा परिणाम केव्हां व कसा करावयाचा हें ईश्वरयोजनेवर अवलंबून राहील; आणि तेवढ्याच पुरतें 'कालं तावत् प्रतीक्षस्व ' हें सूल योग्य आहे. पुण्याचे कले- क्टर हॅच यांनी एकदां अण्णासाहेब यांस प्रश्न केला कीं, Are you an extremist, or moderate ? त्यावर ' या शब्दांच्याविषयीं आपली समजूत काय आहे, तें कळले म्हणजे मी उत्तर देईन' असे अण्णासाहेब यांनी सांगितले. तेव्हां साहेबबहादुरांनी खोंचदारपणानें +An Extremist is he who wants self Goverment sooner, अर्से सहज उत्तर दिले. या साध्या शब्दांत केवढी सोच होती, तें लक्षांत येऊन अण्णासाहेब यांनी उत्तर दिले.x“ Well it rests neither with you nor with me, it rests with the Almighty who brought in. " Sooner या शब्दामध्यें irrespectvie of means असा व्यंगार्थ होता. सारांश काय की शेवटी 'कालं तावत् प्रतीक्षस्व' हेंच खरें आहे. परंतु तोपर्यंत वर सांगितल्याप्रमाणें अनुष्ठान करणें हें आपलें. you

  • आपण जहाल अहा कां मवाळ ?

+ ज्याला मिळेल तितकें लवकर स्वराज्य पाहिजे तो जहाल. x तर मग ते आपल्या कोणाच्याच हातीं नाहीं. ज्यानें आपणांस येथें आणलें तोच तें जाणतो. लवकर म्हणण्यांत ' वाटेल त्या साधनांनीं ' असा ध्वनि होता.