पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय चळवळ. ६० भावना नाहीं, आणि आमचें राष्ट्रियत्व होतां होईल तो जास्त पूर्वोतिहास धरून राहील असा प्रयत्न नाहीं, अशी कांहीतरी 'देश' या नांवाखाली केलेली धामधूम पसंत नसे. सारांश, परिस्थितीचे लोकांस ज्ञान करून देणें, व जसा जमेल तसा कांहींतरी प्रकारचा आपल्या हक्कासाठी सरकारशीं झगडा करणें, यांच्याच बरोबर राष्ट्रीयत्व उत्पन्न होईल, दृढ होईल, निश्चित होईल, आणि लोकांची हीनता जाऊन ते तेजस्वी, व कर्तृत्ववान् होतील, अशा प्रकारच्या लोकशिक्षणाची सोय ज्या चळवळींत नाहीं, ती कधीं यशस्वी होईल, असे त्यांस वाटले नाहीं. म्हणजे असल्या प्रकारच्या राष्ट्रीय चळवळीचीं दोन अंगें असली पाहिजेत, असे त्यांचे मत होतें. एक अंग हें लोकांस परिस्थितीचें ज्ञान देऊन आमच्या राष्ट्रियत्वावर परकीय लोक जो घाव घालीत आहेत, त्यांच्या डावास तोडीस •तोड अशा झुगड्याचें, आसि दुसरे अंग व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीची सर्व तऱ्हेनें प्रत्यक्ष वाढ होईल, अशा तऱ्हेच्या आखाड्यांचे, असे दुसरे अंग अंसल्या- खेरीज केवळ पहिल्या प्रतीची चळवळ केव्हांही जीव धरणार नाहीं. नुसत्या आरडाओरडीनें हिंदुस्थानसारखें गिळलेले माणिक इंग्लंडचा शार्क बाहेर ओ- कील, ही गोष्ट केवळ अशक्य आहे. त्यांनी तसे करावें, असा जबरदस्त पेंच त्यांस पडला पाहिजे, तरच हें काम होणार; आणि असा पेंच त्यांस टाकणें, हें काम येरागबाळाचें खास नव्हे. तेथें जातीवंतच पाहिजे. म्हणून पहिल्या प्रतीची नुसती एकमुखी चळवळ केव्हांही यशस्वी होणार नाहीं, असे ते निश्चितपणे सांगत. आणि तशा तऱ्हेचा आज प्रत्यक्ष अनुभव येत आहे असेंच विचारी माणसास कबूल करावें लागेल. या दोनही अंगांनी चळवळ सुरू व्हावी, हैं देखील कांहीं लहानसान काम नव्हे, मग प्रत्यक्ष तिला यश येणें दूरच राहिलें. पारतंत्र्यांत असलेल्या राष्ट्राला सर्व प्रकारचें शहाणपण वाजूस ठेवून देऊन ‘ कालं तावत् प्रतीक्षस्व ' असेच अखेरीस म्हणावें लागतें, हीहि गोष्ट उघडच आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी जीव मुठीत धरून कसेंच सें आपलेपणानें जगण्याची, आणि अर्थातच, ज्यावर तो आपलेपणा अवलंबून आहे, असल्या सर्व प्रकारच्या संस्कारपरंपरा जिवंत राखण्याची असते. म्हणून या प्राथमिक अवस्थेत जास्त जोर शत्रूशी दोन हात करून कांहींतरी संपादण्याची धडपड करण्यापेक्षां सॅमसन् प्रमाणे स्वतःचे केस वाढविण्यावर 0