पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय चळवळ. सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील त्याचें । परंतु तेथे भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे || 66 एकदां आळंदीस बोलत असतां अण्णासाहेबांनी सांगितलें कीं, कस- ल्याही वैभवाची मला किंमत वाटत नाही. प्रत्यक्ष इंद्राचें जरी ऐश्वर्य आले. तरी तें 'पशम्बराबर' आहे. तेव्हां इंग्लिश लोकांच्या वैभवाचें तरी काय महत्त्व वाटावयाचें आहे ? " त्यावर 'मग तुम्हांला देशाच्या उद्धाराविषयीं खरोखरच वाटतें कां ?' असा प्रश्न केल्यावरून त्यांनी सांगितले की, "हो, हो खरोखरच वाटतें. आणि ते किती वाटतें, तें तुला काय सांगूं ? आर्धी येथली मुक्ति आणि मग तेथील मुक्ति. येथल्या मुक्तीशिवाय, ती मुक्ति मिळाली तरी तिची शोभा नाहीं. " तेव्हां सहज चर्चा निघून या विषयाचा बराच खल झाला. मनुष्य जातीची आध्यात्मिक उन्नति आणि राज्यव्यवस्था यांचा अत्यंत निकट संबंध असल्यामुळे, आध्यात्मिक उन्नतीस पारतंत्र्य हें विघातक असून राज्यव्यवस्थाही ज्यांची त्यांच्याच हातांत असली पाहिजे, असे त्यांचे मत होतें. कोणाचाही द्वेष करूं नये; हें जरी खरे असले, तरी स्वतःचे कल्याण कर म्हणून परमेश्वराची प्रार्थना करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे; इतकेंच नव्हे, तर तें त्याचें कामच आहे. अशा स्थितींमध्ये “ प्राणिमाल तितका सारखा, कोणीही वैभव उपभोगिलें म्हणून काय झाले ? कोणीकडून तरी आपणास निर्विघ्नपणे हरी हरी करतां आलें म्हणजे पुरे, " असला ' समंजस पणा त्यांच्या कोशांत लिहिलेला नव्हता. वैदिक संस्कृति ही जर जगावयाची असेल, तर वैदिक लोक हे पारतंत्र्यांतून निघालेच पाहिजेत, आणि तेवढ्या- करतां झोपेतून जागे झाल्याबरोबर देखील प्रत्येक वैदिक माणसाचा आद्य उद्गार ' महाराज, आतां आमचें आम्हांस द्या,' असाच असला पाहिजे, असे ते म्हणत. परंतु नुसतें मुबलक खाण्यापिण्याचें स्वातंत्र्य हॅही त्यांना संमत नव्हतें. वैदिक धर्माचा आणि वैदिक राष्ट्राचा अभ्युदय व्हावा, आणि या भारतवर्षांतील लोकांनी त्यांचे वैदिक राष्ट्रियत्व कायम राहून स्वतंत्र व्हावे, हेच त्यांना पाहिजे होतें; आणि म्हणून त्यांना ज्यांत राष्ट्रीयत्वाची निश्चित.