Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ स्त्रिया आणि वैदिक संस्कृति. कारण त्यांनी तो बांधला जात नाही. म्हणून राज्यनियम लोकांनी आपापले स्वतःच केले पाहिजेत, किंवा त्यांना ते मान्य असले पाहिजेत. " यावरून स्वातंत्र्यामध्यें स्वतःचें नियमन स्वतःच करणें, आणि दुसऱ्या- कडून करून घेणे, या दोहोंचाही अंतर्भाव होतो. पैकीं ' न स्त्री स्वातंत्र्य मर्हति ' याचा अर्थ तिला स्वतःचें नियमन करून घेण्याचा अधिकार नाहीं, असा होऊं शकत नाहीं. कारण नाहींतर, 'स्वतंत्र कर्ता' या न्यायानें त्यांच्या कडे कोणचीही जबाबदारी न राहती, परंतु कायद्यानें कित्येक गुन्ह्यांत त्यांना दोषी ठरवून, त्यांना शिक्षा सांगितल्या आहेत; म्हणजे त्यांच्याकडे स्वातंत्र्य ठेविले आहे. म्हणून दुसऱ्याकडून नियमन करून घेण्याचा व त्याने केलेले. नियम मान्य करण्याचा जो एक प्रकार सामुदायिक अथवा वैयक्तिक शासन- पद्धतींत आहे त्याच्या संबंधानेंच 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ' हें लागू पडतें.. स्वातंत्र्य शब्दामध्ये जो स्वायत्ततेचा अर्थ आहे, तो वाटेल तसा मोकाटपणा या अर्थाने नसून दुसऱ्याकडून अथवा स्वतःचें स्वतः नियमन करून घेण्याची स्यायत्तता अशा निर्बंधतेच्याच अर्थानें आहे, कारण 'तंत्र' शब्दाचाच अर्थ मुळीं तसा आहे, ही गोष्ट विसरून गेल्यामुळे, स्वातंत्र्य म्हणजे ' मोकाटपणा अशी कल्पना होऊन, त्याबरोबरच असा मोकाटपणा नसणे म्हणजे पारतंत्र्य, अशा कल्पना आल्या. 'तंत्र' शब्दामध्ये ' तन् ' = विस्तार करणे, मांडणी करणें, आणि ‘त्रै’=रक्षण करणें, हे दोन घटक असून, ' रक्षक-शक्तीची कांही तरी मांडणी, किंवा उत्पत्ति' असा या शब्दाचा अर्थ आहे. असो. सारांश काय की ' न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' वगैरे कल्पना आज समजल्या जातात, अशा रीतीनें वैदिक नव्हेत. त्याचप्रमाणे समानता वगैरे कल्पनांचीही गोष्ट आहे. वैदिक धर्मामध्ये स्त्री ही नवऱ्याची अर्धांगी असून धर्म, अर्थ, काम, इत्या- दिकांचे ठिकाणीं त्या दोघांनीही समाचरण करावें असे सांगितले आहे. परंतु त्या अर्धभागित्वाचा अर्थ नवरा टेबलाच्या या बाजूस बसला, तर बायकोने त्या बाजूस बसावें आणि यानें सोमरसाचा एक चषक उडविल्यावरोवर तिनें दुसरा खाली करावा, असा केव्हांही नव्हता. पाश्चात्य पद्धतीत दंपत्याचे आद शंभूत संबंधही घेतले, तर त्यांच्या मुळाशी फार झाले तर प्रेम असूं शकतें, आणि कर्तव्याची कल्पना त्यांच्या मानानें गौण आहे. प्रेमाची उत्कटता कितीही निरपेक्ष असली, तरी त्यांत निदान प्रेमाचा तरी मोबदला मिळावा एवढी तरी