Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वातंत्र्य म्हणजे मोकाटपणा नव्हे. ५१ अण्णासाहेब सांगत असत. आणि पूर्वी एके ठिकाणी सांगितल्याप्रयाण स्त्री शब्दांतील स्त्रीचा नजूर्थी 'स'शी जडलेला योग पाहिला, व वैदिकशास्त्रांत राज्य, दंडनेतृत्व आणि सेनापत्य यांचा अभिषेक कोठेंही सांगितलेला नाहीं, अथवा झाल्याचे उदाहरण नाहीं, पाहिलें म्हणजे या तिनींचा अधिकार •नसलेली समाजांतील व्यक्ती म्हणजे अर्थात् स्त्री-हिला शासनपद्धतींतही मत देण्याचा अधिकार नसावा, हें कांहीं फारसे वावगें दिसत नाहीं असा अर्थ स्वातंत्र्य शब्दाचा कसा होतो, याविषयी त्यांचे म्हणणे जास्त मांडतां येणार नाही परंतु एका लहानशा टांचणावरून कदाचित् थोडासा बोध होईल. बुधवार तारीख १-१-१९०२ या दिवशींचें है टाचण आहे व त्यांत एकाखाली एक अशा नुसत्या दहाबारा कल्पना मांडून पूर्वी एका प्रकरणांत दिलेली ' स्वतंत्रः कर्ता ' म्हणजे मनुष्य स्वतंत्र असून वगैरे टीप दिली आहे. 66 - १ भूगोल = गोल भू = ग्लो + भू = ग्लोव; Be बी = होणें. ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' – अर्थात् पुमान् स्वातंत्र्यमर्हति. २ ३ ४ तंलं किंवा तंत्र्यम् = नियमन करणें, राज्य करणे, आज्ञा करणें, निय- मन करून घेणें ( दुसऱ्याकडून किंवा आपल्याकडून.) ५ राजन् = नियमन करणें, आज्ञा करणें- पासून राजा मुख्य असणें. ६ राजा प्रकृतिरंजनात् ( रघु० सर्ग ४ ). ७ प्रजाः प्रजाःस्वाः इव तंत्रयित्वा ( शाकुंतल ). ८ स्वाराज्यम्. स्वातंत्र्य = स्वातंत्र्यस्य अधिकारः - ९ राज्यम् = नियमन करण्याचा अधिकार. १० स्वतंत्र = स्वराजा, ११ राज्य किंवा तंत्र याचा प्रथम संबंध मनुष्याशी येतो व मनुष्याचे द्वारें भूमीशी किंवा देशाशीं परंपरेनें येतो. १२ प्रत्येक पुरुष स्वतःचा राजा, व स्वतःचीच प्रजा किंवा दास आहे. १३ स्वतंत्र कर्ता म्ह० मनुष्य स्वतंत्र असून जर त्यानें एकादी गोष्ट केली, तरच ती त्यानें केली असे म्हणता येईल, व त्याबद्दल त्यास जवाबदार धरतां येईल म्हणून वागणुकींचे नियम ज्याचे त्यानेंच केले पाहिजेत. म्हणून दुसऱ्यानें केलेल्या नियमांचे उल्लंघन एकाद्यानें केलें, तर त्याबद्दल तो जबाबदार नाहीं,