Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेम व कर्तव्य. ५३ अपेक्षा असते, आणि ती पुरत नसतांनाही प्रेम म्हणजे अंतःकरणाची ओढ आणि कळवळा, ही अढळ असलेली आढळून येतात, परंतु त्या प्रेमी माण- साच्या सुखांत कांहीं तरी, न्यूनता असल्याचा भाव असतो. तशी गोष्ट कर्त- व्याची नाही. आपण कर्तव्य करीत आहों, याची जाणीव हेच त्यांतील सुख आहे; आणि मनुष्य कर्तव्य करीत असतांना या सुखांत न्यूनता होणें शक्यच नाही म्हणून प्रेमापेक्षां कर्तव्याचा जोर अधिक. प्रेम या वृत्तीचा जोर केव- ढाही असला, तरी ती वृत्तीच अशी आहे की, कोणतरी तिचा उपभोग घेण्यांत तिची पूर्तता न झाली तर तिचा जोर कांहीं कमी होतो असें नाहीं. उलट तो अति- शय भयंकर रीतीने वाढेल आणि मनुष्याची अक्कल गुंग करून टाकणाऱ्या धीरो- दात्त गोष्टी करील, तरीपण अखेरीस आपला यथायोग्य रीतीनें उपभोग घेतला गेला नाहीं, आणि त्यामुळे आपली पूर्तता झाली नाही अशी अंतर्गत जाणीव, त्या वृत्तींत असते. परंतु कर्तव्य करीत राहणे हीच कर्तव्याची पूर्तता अस- ल्यामुळे, कर्तव्य हे केवळ 'स्व' तंत्र आहे आणि प्रेम हें थोडेसें 'पर' तंत्र आहे. वैदिक कल्पनेप्रमाणे माणसांनी दुसऱ्याशी जे वागावयाचें तें कांही दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी नसून, स्वतः करितांच वागावयाचे आहे. त्यामुळे दुस- व्याच्या बरेवाईटपणाचा फारसा प्रश्न राहत नाहीं. याशिवाय पुनर्जन्म आणि पारलौकिक अस्तित्व वगैरे गोष्टी वैदिक धर्मास म्हणजे अर्थातच तो धर्म मान्य असलेल्या कोणासही खऱ्या वाटत असल्यामुळे, मनुष्याने केलेल्या उद्यो- गाचें पर्यवसान या साडेतीन हात देहाच्या पर्यवसानावरोवरच होते असे कधींही वाटलें नाहीं. उलट कोणचेंही कर्म, – मग तें कितीही लहान अथवा मोठें असो, फटकळ माणसाच्या वाय बोलाप्रमाणे फुकट जात नाहीं, इतकेंच नव्हे तर, कालाच्या अनंत पोटांत केव्हांना केव्हांतरी फलरूपानें परिणाम पावतें. अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. त्यामुळे चांगले करीत रहावें, आणि ‘ कालं तावत् प्रतीक्षस्व,' याला धरून मुकाट्यानें बसावें. हाच एक त्यांच्या समजुतीप्रमाणें उत्तम मार्ग होय. हें मुख्य तत्त्व लक्षांत ठेवून त्यांनी आपल्या सर्व सामाजिक व खाजगी आचारपरंपरा आणि पद्धति बसविल्या; आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या उपाधीच्या क्षमतेस अनुसरून त्याला मार्ग सांगत असतां स्त्रियांच्या वांट्यास पातिव्रत्य आले. यांत कांहीं अप्पल- योटेपणा नाहीं अथवा वंचकताही नाहीं. हे कसें तें आपण पाहूं.