Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मे १६६ ५० स्त्रिया आणि वैदिक संस्कृति. कल्याण होत असले, तरी वस्तुतः स्त्रीनें हा स्वतः करितांच आचरावयाचा आहे. हरएक प्रकारचा व्यक्तिकल्पनेचा लोप होऊन विश्वकुटुंबित्वच उदयास यावें, अशी रचना करतांना शास्त्रकारांनी असे पाहिले कीं, व्यक्तीव्यक्तीत भेद उत्पन्न करून वितुष्ट आणणाऱ्या सर्व गोष्टींत पैसा, स्त्री आणि कोणावर तरी आपली अकुंठित सत्ता असावी ही इच्छा, या तीन प्रमुख होत. याविषयीं ते लिहितात की, 66 Hindu Law recognized the fact that the woman, the capital whether in the shape of land or other things, and the indomitable desire to possess exclusive power over beings aod things, have been the three grest factors or agents, which generally cause disanion, and differences among men. It therefore amal- gamates, as it were, the woman with the man with an indissoluble marriage-tie having at the same time due regard to the natural laws that hybrids never continue their race and that consanguinity deteriorates the race in the long run. याप्रमाणे स्त्रियांना अभेद्य रीतीनें पुरुषांशीं गांठून दिल्यावर साहजिकच त्यांच्यामार्गे स्वतंत्र कर्तव्य असे उरलें नाहीं. कर्तव्यबुद्धीने प्राप्त परि- स्थिति पार पाडावी, एवढेच त्यांचेमार्गे कर्तव्य उरले. त्यामुळे त्यांचा खरोखर फायदा झाला, किंवा नुकसान झाले, तें पाहूं. पूर्वी एका प्रकरणांत हैं उघडच सांगितले आहे की त्रैवार्णिक आणि शुद्ध व स्त्रिया यांच्यामध्ये निर्बंध काय तो वेदमार्गाचाच होता. इतर कोणच्याही तऱ्हेच्या ज्ञानाचा अथवा मार्गाचा निर्बंध नव्हता. वेदमार्गाचा तरी निर्बंध कां असावा, हैं त्या प्रकरणांत स्पष्टपणें सांगितले आहे. त्यामुळे स्त्रियांस मुद्दाम अज्ञानांत ठेविलें हैं म्हणणे अयोग्य ठरतें. स्त्रिया अज्ञानांत राहिल्या असतील तर तो इतर सामाजिक कारणांचा परिणाम होय. त्याचप्रमाणे स्त्रियांस पारतंत्र्यांत ठंविलें, हेहि म्हणणे बरोबर नाहीं. 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' या वाक्याचा अर्थ स्त्रियांना मोकळीक असूं नये, असा नसून राज्यशासनामध्यें त्यांना मत ( Vote ) देण्याचा अधिकार नव्हता, असा असून हे वाक्य मनुस्मृतीमध्यें हल्लीं ज्या अध्यायांत सांपडतें, तेथील मूळचे नसून दुसऱ्या अध्यायांतील आहे, असे 0