पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रोमन राज्यसंस्था मूळच्या वैदिकच. ४१ · पिशाच शब्दापासून झालेला Psyche ( यांतील P चे पाश्चात्य पंडीतास कोडें होतें ); तसेंच तेलगू गोटलु आणि goat, cattle; संस्कृत ऋक्य आणि right ( ही g उलगडत नव्हती ती ऋक्थ मधील 'क' कार होय ) असे अनेक शब्द ते भराभर सांगत, परंतु कोणी उतरून ठेवण्याचा उद्योग न केल्यामुळे या नुसत्या दिग्दर्शनावरच तहान भागविणे भाग आहे. रोमन लोकांना विशेषतः आपल्या राजकीय संस्था आणि कायदे यांचाच फार अभिमान होता, आणि त्याकरितां अजूनही त्यांचा अभिमान बाळगण्यांत येतो. परंतु त्यांच्या राजकीय संस्था आणि कायद्याची पद्धती या वैदिक लोकां- पासून जशाच्या तशाच उचलल्या आहेत, असे ते दाखवीत असत. मूळ स्टेट हाच शब्द ' संस्था ' शब्दापासूनच झाला आहे. त्याचप्रमाणे तत्संबंधी इतर कल्पनांचे शब्द Comitia म्हणजे समिति Curia म्हणजे सुर to govern, rex राजा, Socious सखी, Juris ऊर्जस्, Tribune लैवर्ण, Triumvirate त्र्यावरा, आणि Decemvirate दशावरा- अशा रितीनें संस्कृतांतून जसेच्या तसे उचलले आहेत. त्याशिवाय Allodium म्हणजे लोष्ठ, Savants=सर्वज्ञ, Omega ओं + एकं, आणि Amen= • तेलगु ऑ माँ, वगैरे शब्दांचे इतिहास सांगून तें आपले म्हणणें सिद्ध करून दाखवीत असत. तसें अर्थातच मला सांगणे शक्य नाहीं. परंतु मुख्य कल्पना मला मांडतां आली तितक्या स्पष्टपणें मी मांडीत आहे. ही सूचक होऊन जर कोणी विद्वान परिश्रम करील, तर वाङ्मय व इतिहास यांच्या दृष्टीनें व इतरही अनेक बाजूंनी फायदा होईल. यासंबंधी त्यांचा हातचा एक मराठी उल्लेख सांपडतो - 'स्व, ' 'निज, ' 'हीं नांवें आत्म्याची आहेत, व तीं अव्ययें होत. जरी यातील अर्थ किंवा वस्तु नामवाचक आहे तरी. कारण ती चस्तु अविनाशी किंवा न पालटणारी ( आहे). किंवा कमीजास्त होणारी नाहीं. हें माझें राज्य असें प्रत्येकाला म्हणतां येईल ते स्वराज्य - लोकनियुक्त-प्रजा- सत्ताक होय. आत्मा एकच असून तो सर्वत्र भरलेला आहे, म्हणून त्याच्या सत्तेचा व अधिकाराचा अंश सर्वांस सारखाच मिळाला पाहिजे. हा स्वराज्याचा च स्वातंत्र्याचा पाया मूळ वैदिकज्ञान व भाषा ( यांत ) व त्या भाषेच्या रक्तांत होय. अवैदिक भाषेतील अ. इ, उ, ए इत्यादि स्वर Cut, Kit, Put, Get, Fat इत्यादि उच्चारते वेळेस समजले पाहिजे, कारण यांचा