Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

6 , भाषाशास्त्र व मानववंश. ४२ उच्चार होते वेळेस उराच्या शिपी जवळील भागास धक्का बसतो. तसा वैदिक अ, इ इत्यादि उच्चारते वेळेस बसत नाहीं. " रोमन लोकांत पुढे उत्पन्न झालेली आणि परंपरेनें आतां सर्व जगांत स्थापित होऊं पाहणारी लोकसत्ताक राज्याची कल्पना ही देखील मूळ रोमन कल्पना नसून वैदिक कल्पनाच आहे. याविषयीं ते स्वतःच लिहितात. “ 'स्वतंत्रः कर्ता' ". ( तंत्र म्हणजे राज्य करणें, नियमन करणे; जसें ‘प्रजाः प्रजाः स्वा इव तंत्रयित्वा. 'शाकुंतल ) मनुष्य स्वतंत्र्य असून जर त्यानें एखादी गोष्ट केली, तरच ती त्याने केली असे म्हणतां येईल व त्याबद्दल त्यांस जबाबदार धरतां येईल. म्हणून वागणुकीचे नियम ज्याचे त्यानेंच केले पाहिजेत. दुसऱ्याने केलेल्या नियमांचे उल्लंघन एखाद्यानें केले तर त्याबद्दल तो जवावदार नाही. कारण त्यांनी तो बांधला जात नाहीं. म्हणून राज्य नियम लोकांनी आपापलें स्वतः केले पाहिजेत; किंवा त्यांना ते मान्य असले पाहिजेत. म्हणून नियम किंवा राज्य करण्याचा अधिकार लोकां- नीच दिला पाहिजे, व तो अधिकार स्वतः अविभाज्य आहे. म्हणून तो एका व्यक्तीस अथवा समूह व्यक्तीस देतां येईल. म्हणून राज्य म्हणजे लोक- सत्तात्मकच पाहिजे. म्हणून हिंदुधर्म शास्त्रांत राज्य कोणास मिळावे याविषयीं नियम सांगितलें नाहींत. राज्य देतां येतें, पण घेतां येत नाहीं. पाश्चिमात्य देशांत राज्य म्हणजे लोकांवरील व लोकांचा नियमन व अधिकार ही मूळ कल्पना नष्ट होऊन, सामान्य भूमी असा अर्थ झाला, व तें स्थावर वडील मुलास मिळते, असा वारसाचा नियम होऊन बसला, यावरून लोक- सत्तात्मक राज्य कल्पना त्या त्या देशांत नव्हती किंवा नष्ट झाली असें म्हटले पाहिजे." बुधवार १--१-१९०२ ].