Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यज्ञांतील मांसाशन हैं ग्राह्य कां ? ३१ उपयोग सांगितला आहे. त्यांतील ब्राह्मणादिकांनीं वनस्पतीचा वगैरे व इतरांनी वाटल्यास मांसाचा वगैरे उपयोग करावयाचा ही गोष्ट इतकी सरळ होती की तिचा मुद्दाम उल्लेख करण्याचेंही कारण नव्हते. त्यावरून ब्राह्मण मांस खात होते, हा सिद्धांत स्थापित होत नाही. जर एकाद्या रोगास प्राणिज चिकित्से- खेरीज दुसरा उपायच दिला नसता तर मात्र तसे म्हणतां आलें असतें. हल्लीही असें पैजेवर दाखवितां येईल कीं युरोपिअन प्राणिज औषधापेक्षां वनस्पती अथवा खनिज पदार्थ हेच वैद्यकदृष्टया खरे गुणकारी असतात. प्राणिज औष- घांचा रोग बरा करण्यांत जरी उपयोग होती, तरी, रोगाची समूळ भावना रक्तांतून काढण्याचे काम तीं करूं शकत नाहीत, आणि रोग्याचें रक्त पूर्वी- प्रमाणे प्रकृतिस्थ करण्याच्या ऐवजी आपला कांहीतरी शिक्का त्यावर ती ठेव- तात. त्यामुळे त्यांचा गुण व त्यांनी आलेलें आरोग्य ही टिकाऊ नसतात. म्हणून वैद्यश। स्त्रदृष्टयाही त्यांचा उपयोग करणें पिढ्यान् पिढ्या शुद्ध असलेल्या आमच्या शरीरास एकंदर घातकच आहे. वस्तुतः वनस्पति वगैरेंतून जो कोही सत्त्वांश मनुष्याच्या मनबुद्धि वगैरेंच्या पोषणास लागावयाचा तो त्या वनस्पति वगैरे पशुशरीरांत जाऊन मांसरूप झाल्यामुळे त्यांतून निघून गेलेला असतो, म्हणजे ओज वगैरेंच्या दृष्टीने ते आधींच मेलेले असते. अशा मृत अन्नापासून जरी शरीर जास्त पोसलें गेलें, आणि स्नायुबल अधिक वाढलें, तरी आंतल्या जीवास लाभ न होतां उलट नुकसानच होणार हे उघड आहे. वनस्पतींचे मांसांत रूपांतर करून त्यांतील प्रोटीन ( Proteins ) वगैरे निघून गेल्यावर त्यांचें सेवन करण्यापेक्षां ऐनजिनशीं जिवंत स्थितींतच (वनस्पतिद्वारा ) सेवन केलेले काय वाईट ? आवश्यकतेच्या दृष्टीनेंही तें सेवन करूं नये, असे त्यांचे म्हणणें होतें. आवश्यकतेच्या दृष्टीनें मांसाशनाचे समर्थन करणारे लोक मुख्य दोन मुद्दे पुढे आणतात. पहिला, त्या खेरीज आजकाल अवश्य असलेली क्षात्रवृत्ति उत्पन्न होणार नाही, आणि वाढणार नाहीं. क्रौर्य व शौर्य या दोन सारख्या दिसल्या तरी अगदर्दी भिन्न वृत्ति आहेत, मासांशनानें क्रौर्य वाढतें, शौर्याचा त्याच्याशीं संबंध नाहीं, व राष्ट्राच्या खऱ्या उन्नतीस कौर्याची गरज आहे कां शौर्याची वगैरे गोष्टी लक्षांत न घेतल्यामुळे हा भ्रम उत्पन्न झाला आहे. दुसरा अस