Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० मांसाशन. इकडून तिकडे नेण्यास ज्याप्रमाणे वाहक पदार्थाच्या जाडीचें अथवा वजनाचें कारण नाहीं, तांब्याची कितीही वारीक कां होईना तार असली म्हणजे पुरे. तसेंच हेही आहे. आणि त्याचप्रमाणानें पूर्वी ग्रहण करीत. जसा मूळयज्ञ जाऊन केवळ पशु जाळणें राहिलें, तसाच मांसाचा उपयोग वाहक पदार्थ म्हणून केवळ अणुमात्र करावयाचा हे मागें पडून, त्यावर यथेच्छ ताव मारण्याची क्वचित् प्रवृत्ति झाली. मांसवाल वगैरे सांग- णाऱ्या तंत्रशास्त्रांत देखील मूळ मापप्रमाण मांस घ्यावें जास्त सेवन करणे हें पाप आहे, असेंच सांगितले आहे. आणि त्याचें कारणही हेच आहे. ज्या वेळेस अशा रीतीनें यज्ञ होईनासा झाला, तेव्हां अर्थातच यज्ञसंस्था कायम ठेवून पिष्टपशुची योजना करण्यांत आली. पिष्टपशूनें केलेल्या यज्ञांत कांहीं अर्थ आहे किंवा नाहीं, अथवा ती संस्थाच कायम ठेवली, हा प्रश्न वेगळा आहे, त्याचा मांसाशनाशी संबंध नाही. सारांश शास्त्रीय दृष्ट्याहि मांस खाणे निषिद्ध आहे, आणि ब्राह्मण्यास विरुद्ध आहे, असे त्यांचे ठाम मत होतें. गवालंभनासंवधेहि अर्सेच त्यांचे मत होते, परंतु काही कारणामुळे प्रस्तुत लेखकास त्याचा उद्देश ऐकावयास सांपडला नाहीं. सृष्टिशास्त्रदृष्टया आणि वैद्यकदृष्ट्याही मांसाशन अयोग्य आहे, असेंच त्यांचे मत होतें. भूमीवरील मांसाहारी प्राणी आणि शाकाहारी प्राणी यांची तुलना केली असतां असे आढळून येतें कीं मांसाहारी प्राण्यापेक्षां शुद्ध शाकाहारी प्राणीच बलवान् ज्यास्त सांपडतात. वाघ, सिंह अथवा ध्रुव प्रदेशांतील अस्वले हेच काय ते मांसाहारी प्राण्यांतील मोठे जबरदस्त होत. परंतु हत्ती, गेंडा, आफ्रिकेतील कित्येक वानरांच्या जाति फार तर काय पण साधा रानरेडा, यांच्या पासंगासही व्याघ्रादिकांची शक्ति पुरावयाची नाही. त्याचप्रमाणे वन- स्पत्याहारी जीवांच्या शरीराशींच मनुष्याच्या शरीराचे साधर्म्य आहे, वगैरे कारणे सांगत असत. परंतु त्या दृष्टीनें पुष्कळांनीं विचार केला असल्यामुळे त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता नाहीं. वैद्यशास्त्रदृष्टयाही त्याची आवश्य- कता नाही, असे त्यांचें मत होतें. आपल्याकडील वैद्यशास्त्रांतही प्राण्यांच्या मांसाचा वगैरे उपयोग सांगितला आहे, आणि त्यावरून पूर्वी केव्हां तरी ब्राह्मण लोक मांस खात असलेच पाहिजेत, असे कांही लोक म्हणतात. परंतु जेथें प्राणिज पदार्थांची चिकित्सा दिली आहे, तेथेंच खनिज आणि वानस्पत्य द्रव्यांचा