Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ मांसाशन. कीं, हल्लींच्या जीवनकलहांत मांसाहाराखेरीज भागणार नाहीं. परंतु हैं म्हणणे भ्रामक असून मांस खाण्यास चटावलेल्या लोकांचें आहे. एक तर, राष्ट्रीयदृष्टया हिंदु लोकांत क्षात्रवृत्ति - धैर्य, साहस वगैरेंचा उणें- पणा आहे, असें कवूल केलें तरी त्याची अनेक दुसरी कारणे आहेत. फार झाले तर, दीडकोट ब्राह्मण वजा जातां बाकीचा हिंदुधर्मी समाज मांस खाण्यास मोकळा होता व आहेही. असे असतां, राष्ट्रीयदृष्ट्या अडून राहिले आहे, असे म्हणणें कसें शोभेल ? आणि घटकाभर असेंही कवूल केलें कीं अडले आहे, तरी देखोल, बाकीच्या सुमारे २० कोटी लोकांस उजळ माथ्यानें वाटेल तितकें मांस खावयास घालून पृथ्वीवरील कोणच्याही जातींत हिंदुलोकांस आजंक्य होण्याची सोय आहे. तेवढ्याकरितां ब्राह्मणांनीच आपला विशिष्टपणा सोड- ण्याचे कारण नाहीं. वरें बाकीचा समाज क्षात्रवृत्तीनें युक्त असतां, त्यांच्या- बरोबर निवृत्तमांस ब्राह्मणही कांहीं तरवार गाजवूं शकतो, याची इतिहास जाणणायांस तरी शंका नको. कांही ब्राह्मण लोकांचें असें म्हणणे आहे कीं, हल्लींच्या परिस्थितीत ब्राह्मण लोकांचा विशिष्टपणा त्यांना कायम राखतां येणार नाहीं, आणि मांशासन न केल्यास इतरांच्या मानानें तेच फार दुबळे राहून समाजांतील एक घटक ( Class ) या नात्यानेही त्यांना आपले अस्तित्व राखतां येणार नाही. कारण पूर्वीसारखा दूध, तूप वगैरे स्निग्ध पदार्थांचा पुर वठा दिवसेंदिवस मिळत नाही, आणि कदाचित् कांहीं कालानें त्यांचा वेदां- तील सोमरसाप्रमाणें अजीवात अभाव होतो की काय, अशी स्थिति दिसत आहे. अशा वेळी शरीरास पुष्ट करणारें व दुधातुपासारखें स्निग्ध असें मांसा- शियाय दुसरे काय आहे ? यावर त्यांचें असें म्हणणें होतें कीं ब्राह्मणांच्या आहाराची घडी इतकी चांगली बसविली आहे कीं, इतर वाजूंनी आचार व्यवहार वगैरे जसा पाहिजे तसा ठेवला, आणि वीजतः संतति श्रेष्ठ प्रतीची होण्याइतका इंद्रियनिग्रह ठेवला, तर मांसाशनाची गरज पडणार नाहीं. वन- स्पतीच्या आहारांतच शास्त्रीयदृष्टया पाहिजे तसे फरक केले म्हणजे दुधातु- पाचेंही कार्य घडून येतें; त्यांतूनही जर कांहीं कमी पडतें असे वाटले तर प्राणायाम वगैरे ब्रह्मकमीनी उत्पन्न झालेल्या ओजस्वितेनें तें भरून निघेल, इतकेंच नाही, तर ब्राह्मण जातीचें विशिष्टत्व आणि उच्चपणा हीं त्यामुळेच वाटेल त्या विरोधांत अबाधित राहतील, जड दृष्टीनें बोलावयाचें म्हणजे तंतुजाल