Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चातुर्वर्ण्य कितीही भिन्नता असली, तरी राष्ट्राचा जोम जर कायम असेल तर राजकीय आपत्तीत त्याची एकी व्हावयास मुळीच वेळ लागत नाहीं. याच्या उलट जरी सर्वच सवर्णता असली, आणि राष्ट्रांत जोम नसला तर अनेक कृत्रिम भेद उत्पन्न होतात, आणि राष्ट्र नाश पावतें, अथवा वर डोकें करूं शकत नाही, असें इतिहासाचें महावाक्य आहे. दुसऱ्या अनेक तन्हांनी पुष्कळ काळांत जोम उत्पन्न करतां येईल, परंतु त्याच काळांत, किबहुना त्यापेक्षां फारच थोड्या काळांत जर चातुर्वर्ण्याचा उद्धार हें काम अधिक तीव्रतेने करूं शकेल, तर स्वतःच्या एवढ्या भव्य आणि दिव्य राष्ट्रियत्वास पारखे होऊन, केवळ राजकीयदृष्टया खाण्यापिण्याचें सुख थोडे चांगले मिळवून, कोणी तरी लोक म्हणून जगण्यांत माणुसकी ती काय आहे ?

श्रीअण्णासाहेब यांच्या लेखांतील ज्या कांहीं उताऱ्यांवरून हें प्रकरण तयार केले आहे त्यांतील कांहीं पुढे दिले आहेत उतारे वरेच मोठे असल्यानें ते जर लेखात ठिकठिकाणी घातले असते तर त्या योगानें मराठी वाचकांचा वाचतांना वारंवार विरस झाला असता. त्यांच्या करितां म्हणून या उताऱ्यांचे मराठी भाषांतर द्यावें तर लेखांत तोच विषय असल्याने विनाकारण प्रकरण मात्र लांबलें असतें. एवढ्या करितां यांचा समावेश लेखांत न करितां ते येथें . स्वतंत्रच दिले आहेत. [ T. Science म्हणजे Transcendental Science हा शब्द या सर्व उताऱ्यांत क्यांट वगैरे युरोपीय विद्वांनाच्या अर्थाने योजिला नसून ‘ ब्रह्मविद्या ' अशा अर्थानें योजिला आहे व त्या शब्दाचा अर्थ पुढें पान २१ कलम ७ यांत स्पष्ट केला आहे. ] It may, perhaps, be asked or questioned whether T. Science is capable of doing anygood to world at large. It has already been said above that the study of the T. Science has never been opposed to, nor has is any retard- ing effect on the advancement of the Secular and ma- terial knowledge. In the halcyon days of the Vaidk Civilization the T. Science was the UNFAILING