पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोमदारपणानें एकी होते; एकंकारानें नाहीं. १७ म्हणून सवर्णता करण्याच्या यत्नांत मत्सर, द्वेष, संकुचितपणा, स्वार्थ, वगैरे तर निघून जात नाहीतच, परंतु उलट सामान्य भलेपणापलीकडे राष्ट्रियदृष्टीनें शीलास कांहींच बंध न राहिल्यामुळे समाजांतील जोम निघून जाऊन, तो जास्त विस्कळित आणि पतित होतो. राष्ट्र जगतें तें जोमदारपणानें जगतें, नुसत्या गोड कल्पनांनी जगत नाहीं; आणि वरीलप्रमाणें चातुर्वर्ण्य सुधार- ण्याच्या प्रयत्नांनी राष्ट्राचा जोम कमी न होतां, उलट अशा रीतीनें वाढेल कीं, इंग्रजशाहीसारखे आणखी घाले आले तरी देखील त्यांस झुगारून देण्याची ताकद येईल. वरील सर्व विवेचनावरून लक्षांत येईलच की चातुर्वर्ण्य हें केव्हांहि उत्पत्ति- सिद्धच असले पाहिजे, आणि जरी आजच्या स्थितींत त्याची पुनर्घटना कर णारांना, चातुर्वर्ण्यच करतां आलें नाहीं, तरी प्रथमतः निदान ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर एवढा भेद ठेवूनच सुरवात करणे भाग आहे; आणि चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीकडे पाहिले तर एवढेच दोन वर्ण असणे अवश्य आहे. हल्लींच्या काळी चातुर्वर्ण्य रक्षण करणारांना आणि त्यांतून ब्राह्मणांना ( कारण, त्यांच्यावरच ही जवाबदारी विशेष आहे, कारण अर्वाचीन कल्पनांप्रमाणे त्यांना खालील समाजांत मिळून जावयाचें आहे. ) त्यांच्या आचारधर्माविषयी फार मोठा प्रश्न येऊन पडेल. कारण, विधवांची वाढती संख्या, दारिद्र्य, विवाहसंस्थेतील फरक, आधुनिक शिक्षणाची आवश्यकता, आणि त्याचे दुष्परिणाम, त्याचप्रमाणें नवीन काळानें उत्पन्न केलेल्या अनेक संस्था, या सर्वांचे प्रश्न कसे सोडवावे, हा मोठाच प्रश्न वाटेल; परंतु ही विचारसरणी चुकीची आहे. निःसत्त्व माणूस अशा स्थितींत जो जो मार्ग काहूं म्हणेल, तो तो शरणागतीचाच असावयाचा. चातुर्वर्ण्य सुधारण्याच्या दृष्टीने त्यांच्या हातून काय काम होणार ? तेव्हां प्रथ- मतः वैदिक संस्कृति आणि वैदिक राष्ट्रियत्व हीं ठळकपणे उमटून पडतील अशा रीतीनें चातुर्वर्ण्य राखण्याची शपथ घेऊं द्या, आणि त्या दृष्टीनें शरीरें सुधारण्याचें कंकण बांधू द्या, म्हणजे हे सारे प्रश्न थोडी देखील खळखळ न होतां कालाला अनुसरून जसे पाहिजेत तसे आपोआप सुटतील; आणि जरी वाटतें तितक्या वेळांत सुटले नाहींत आणि समाजांत अतिशय भिन्नता राहिली, तरी ती भिन्नता राजकीय कल्याणाच्या आड येणार नाहीं. राष्ट्रामध्ये खं... २