पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चातुर्वर्ण्य वर्ण आणि ब्राह्मण, आणि त्यांतून ब्राह्मणांची तर कितीतरी पटीने अधिक, ब्रह्मविद्येच्या लायख शरीरें आहेत. खालील जातींना ब्राह्मण बनणें तर कांहीं शक्य नाही. कारण नुसत्या नांवानें कांहीं शरीराची आंतररचना पालटत नाहीं. विश्वामित्राचें पौराणिक उदाहरण टाकले तरी, त्याला निदान तुकाराम महाराजांच्या इतकी तरी तपश्चर्या पाहिजे. तेव्हां सवर्णता करण्याचा एकच मार्ग म्हणजे सर्वांनीच चातुर्वर्ण्यबाह्य व्हावें. असें चातुर्वर्ण्यवाह्य होऊन परभ- श्रेष्ठ ध्येय सोडून द्यावें, वाडवडिलांनीं हजारों वर्षे आपल्या सर्वस्वाच्या आहुति देऊन जतन केलेली संस्कृति झुगारून द्यावी, आणि वैदिक राष्ट्र या दृष्टीनें नामशेष होऊन रहावें; किंवा खाण्यापिण्याचें सुख जरी मिळाले नाहीं, आणि अत्यंत हाल सोसावे लागले, तरी तेंच ध्येय उराशी ठेवून वैदिक संस्कृति आणि वैदिक राष्ट्रियत्व हीं एकच आहेत, हे ओळखून त्याच राष्ट्रियत्वाने जग ण्यांत शोभा मानावी, हा प्रश्न आहे. जर त्याच राष्ट्रियत्वाने जगावयाचें असेल तर, दिशाभूल होणार नाहीं इतक्या ठसठसीत रीतीनें तरी ती संस्कृति टिक- विली पाहिजे, आणि चातुर्वर्ण्यसंस्था सुधारली पाहिजे. मिश्रविवाह, अतिनिर्बंध, अन्नपानादि व्यवहार, यांनी सवर्णता येईल, व राजकीयदृष्टया व व्यवहारदृष्टया कांहीं तात्पुरते फायदे होतील. पण ती चातुर्वर्ण्याची सुधारणा नसून, चातु-. वर्ण्य मोडून आलेली एकरूपता आहे. ज्यांना चातुर्वर्ण्य खरें सुधारावयाचें असेल, त्यांनी सर्वप्रकारचा स्वार्थत्याग करून, ब्राह्मणांनी गायत्रीच्या साहाय्यानें आणि इतरांनी योग, भक्ति इत्यादि इतर साधनांनी आपली शरीरें शुद्ध करून, निदान कांही पिढ्यांनी तरी ती पूर्वस्थितींवर येतील, असा आचार व असले कर्म केले पाहिजे. प्रस्तुतच्या काळांत आणि भौतिकशास्त्रांच्या सर्व- व्यापी प्रगतीत हें कसें घडून आणतां येईल, तें एकाच वाक्यांत सांगतां येणार नाहीं. तरी पण कळकळीनें, करावयासच बसले असतां, हे प्रश्न न सुट- ण्याइतकी परिस्थिती खास विघडली नाही. याचा अर्थ असा नाहीं कीं, शरीरें सुधाररावयाचीं म्हणजे सर्वांनी जंगलांत जाऊन रहावयाचें, उलट सर्व प्रकारचें भौतिक शास्त्रीय ज्ञान आणि साधनें यांचा उपयोग करूनच हें करावयाचें आहे. त्याचप्रमाणे, याच्या मागे लागल्यास दृष्टया प्रगति होणार नाहीं, आणि राष्ट्रियत्वाची अशी घडी बसविण्याच्या नादांत आम्ही राजकीयदृष्टया मरून जाऊं, अशी शंका घेण्याचेही कारण नाहीं. राजकीयदृष्टया प्रगति करण्याकरितां