Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

औषधे सांगण्याचा सभारंभ. २८१ ऐकल्यावर अण्णासाहेबांनी सरळपणाने सांगितले की ' अहो, काढ्यांत एरंड- मूळ मी जे ठेवतों, तें कांहीं विरेचक म्हणून नव्हे, तर त्याच्या अंगों जो वाहकधर्म आहे, त्याकरितां ठेवतों, त्यामुळे बाकींच्या औषधांचें कार्य चांगलें व लौकर घडून येण्यास मदत होते.' यावरून काढे सांगण्यांतील त्यांचें धोरण थोर्डेबहुत लक्षांत येईल. संग्रहणी वगैरे सारख्या रोगावरील का- ढ्यांत एरंडमूळ गाळलेले असे, हें मग आमच्या लक्षांत आलें. मनुष्यशरी- राच्या सर्व विकृतींचा विचार करून त्यांनी एक चौसष्ट औषघांचा काढा तयार केला आहे, व त्यांतील औषधांची प्रमाणे जर देशकालवर्तमानास अनुसरून, कोणी जाणत्या माणसानें बसवून दिली तर तो काढा सामान्यतः वाटेल त्या विकृतीवर चालण्यास हरकत नाही असे वाटतें. कुशलतेनें योजना केली असतां या चौसष्ट औषधांपलीकडे इतर वनस्पतींचा उपयोग बहुतकरून पडत नाही, असे ते म्हणत. असो. O वैद्यकांच्या कामासंबंधी गुरुवार व रविवार असे दोन वार पूर्वीपासूनच ठेविले होते. आणि त्या दिवशी हात दाखविणारांचा एकच तोबा उडत असे. अलीकडे अलीकडे तर या दिवशी पहाटेस सात वाजल्यापासूनच लोकांची रहदारी सुरू होई. व घरांतल्या माणसांनी कितीही मनाई केली तरी काहींना कांहीं करून लोकांनी वर जावें, व मग त्यांना नुसते प्रातःस्मरणही करावयास वेळ सांपडूं नये. अशा रीतीने दुपारी चार पांच वाजेपर्यंत व कधी कधी तर सायंकाळपर्यंतही माडीवरच कारखाना सुरू होई. तेवढ्या वेळांत खाली चौक व पडवी स्त्रीपुरुषांनी गच्च भरून जाई. तेव्हां ते खाली येत. व मग रात्रीं चार चार वाजेपर्यंत सारखा कारखाना सुरू असे. याचा अनुभव असलेले हजारों लोक पुण्यांत अजूनही आहेत, यांत एका अक्षरःर्चाही आतिशयोक्ति नाहीं. एक मोठा दिवा, लहानसें तढव, दीत, टांक, व कागदांचे तुकडे ही या दवाखान्याची सामग्री असे. तेथे रात्रीच्या वेळीं, दिव्याच्या प्रकाशांत सर्व तऱ्हेच्या स्त्रीपुरुषांच्या घोळक्यांत आठ आठ तास सारखें बसून, हास्य विनो- दानें, कोणाचा हात पहा, कोणास औषध सांग, कोणाची कांहीतरी थट्टा कर, अशा रीतीनें काम करीत असतांना, अधिक श्रमाने गळून न जातां उलट त्यांची क्रांति जास्त देदीप्यमान होऊन मुद्रा अधिक प्रफुल्ल झालेली पाहून पाहणारास काहीं विचित्र त-हेचा भास होत असे. माणसाच्या तेजानें अथवा