Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० वैद्यकी. हा त्यांचा नादिष्टपणा वाटे; परंतु अशा वेळीं वर सांगितल्याप्रमाणें सारीं धोरणें सांभाळून, औषधयोजना कशी करावी, याचाच ते विचार करीत. ( आपल्या काढय़ांत इतकी औषधें कां असतात, ' याचे कारण एकदां त्यांनी स्वतःच सांगितले होतें कीं, “ वनस्पतींच्या अंगीं भिन्नभिन्न धर्म अस तात, त्यांतील एकाद्या दुसऱ्या धर्माची मला गरज असते व बाकींच्या धर्माची गरज नसते इतकेंच नाहीं तर, कांही प्रसंगी ते टाळणेंही जरूर असते; तेव्हां नेमक्या त्याच धर्माचा उपयोग व्हावा, आणि इतरांचा परिणाम होऊं नये, म्हणून एका औषधाबरोबर दुसरी औषधेही घालावी लागतात; व अशा रीतीनें काढा लांबलचक होतो. उदाहरणार्थ एकाद्या प्रसंगी सुंठींतील दीपक गुण तर पाहिजे आहे, परंतु तिच्या उष्णपणाचा तर परिणाम होऊं नये, म्हणून तिला धमासा, वाळा, वगैरेची जोड दिलेली असते. अशाच बारीक योजनेनें सर्व काढे तयार होत, परंतु त्यांतील बारीक धोरण लक्षांत न आल्यामुळे चांगल्या चांगल्या वैद्यांच्याही एवढ्या औषधांचें, अथवा ह्या काढय़ांत ह्या औष- धांचें काय काम, हे लक्षांत येत नसे व त्यामुळे ज्याला जसे वाटेल तसे तो तर्क करी. याचे एक लहानसे उदाहरण सुप्रसिद्ध तपस्वी बाबासाहेब परांजपे, यांचें आमचे लक्षांत आहे. फार काळ गेला असल्यामुळे व गोष्ट लहान असल्यामुळे खुद्द त्यांच्याच स्मरणांत ती असेल की नाही कोण जाणे, परंतु आम्हांस ती चांगलीच आठवते. रात्री १० ची वेळ होती. व प. वा. डॉ. वझे किंवा कोणीसा गृहस्थ आजारी होता, ( बहुतकरून डॉ. वझे असावे असे वाटतें ). त्यांच्या औषधासंबध वोलणे करण्यास बाबासाहेब आले होते बोलतां वोलतां त्यांनी मध्येंच सुचविले की 'बाळहिरडा बहावा शेंग वगैरे असल्यामुळे एरंडमुळाची कांहीं गरज नाहीं, व तें काढून टाकले तरी चालेल. ' अण्णासाहेव यांचा काढा म्हटला म्हणजे त्यांचा प्रारंभ गुळवेलींनेंच व्हावयाचा, व शेवट कडुनिंबाच्या पानांनीच व्हावयाचा हैं अगदी ठरलेलेच असे. या एंजिन ब्रेक्सच्या मध्ये मग वाटेल तितके डबे असोत. त्याचप्रमाणे मध्यें पांढरी वसू, एरंडमूळ, हे वतनदार लोक असावयाचे मधून मधून खगोलांत फिरणाऱ्या जोड तान्यांप्रमाणे सुंठ धमासा, देवदाररास्ना, वगैरे जोड्याही एकमेकांस न सोडतां विनचूक याव याच्याच. त्याप्रमाणेच या काव्यांतही एरंडमूळ होतें. बाबासाहेबांची सूचना