Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 वैद्यकी. सौंदर्याच्या प्रभेनें दिव्याची प्रभा देखील मंद होते, अशा प्रकारची वर्णने काव्यनाटकांत वाचण्यांत येतात; त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्या वेळी घ्यावयास सांपडे, आणि क्षणमात्र, दिव्याच्या तेजानें यांचे मुखमंडल उज्ज्वल झाले आहे, किंवा यांच्या मुद्रेवरील दिव्य प्रभापूरांत दिव्याची ज्योत बुडून जात आहे, हें समजत नसे ! दिवसभर पोटांत पाण्याचा थेंब देखील नसे, त्यांतल्या त्यांत हात पाहतां पाहतां मधेंच वेळ करून कोणा तरी रोग्याला त्याचे घरीं पाहून आलेले असत, व इतरही परिश्रम झालेले असत; परंतु तशा वेळींही हातांत कंदील घेऊन स्वतःचा दिवस सुरू करण्याकरितां शौचास जावयाची तयारीच असे. मात्र खाण्यापिण्याची गोष्ट काढली की मोठा राग येई. अगदी अलीकडे तर दिवसांचा आणि वेळेचाही निर्बंध नव्हता; हरप्रकार करून पुरुषांनीं व बायांनीं वर यावें, व मग कोणचाही दिवस असो, चिकित्सेस सुरवात व्हावयाची. वैद्यकीवर पैसा मिळवावयाचा नाहीं, वकीलीवर उदरनिर्वाह करावयाचा, हें तर त्यांचें ठरलेलेच होतें, व ते त्यांनी इतक्या कडकपणे पाळले की, तशा संबंघाने येणाऱ्या एकाद्यानें प्रसादाच्या निमित्ताने आणलेले एकादें केळदेखील त्यांनी घरांत वाटू देऊं नये, तसेंच ओंकारेश्वरावर अथवा एकाद्या देवळांत पाठवून तेथें वाटावयांस सांगावें. रोगी पहावयास म्हणून कोठें गेले असतां तेथें तर पाण्याचा घोंटही न घेण्याचा त्यांचा परिपाठ होता. श्रीमंत व मिजासखोर लोक सोडून दिले तर रोगी पहावयास नेण्याकरितां कोणी टांगा आणलेलाही त्यांना आवडला नाहीं, व कोणी आग्रहाने आणलाच तर, ते अतिशय नाराज झालेले दिसत, चटकन् कधीं रोगी पहावयास गेले आहेत, असे होत नसे. 'आज येतों, उद्यां येतों, आत्तां येतों, मग येतों, या गुरुवारी येतों, आज तर काय अमावास्या आहे, आजचा दिवस जाऊं या,' असें करतां करतां, दिवसच दिवस निघून जात, व त्यांचा मतलब न कळल्या- मुळे रोगी व त्याच्या येथील माणसेंही निराश होऊन जात; परंतु असें करण्यांत त्यांचें धोरण काय असे, याचें दिग्दर्शन मागें केलेंच आहे. एकदा त्यांना विचारलें होतें कीं, 'रोग्यानें निव्वळ दुधावरच रहावे, असा सर्वच रोगांत तुमचा कटाक्ष कां ? रोगी तर तसे करीत नाहीं, तोंडावर 'हो म्हणून मागें भातबित कांहो तरी खातातच !' तेव्हां ते म्हणाले, 'हें काय मला माहीत नाहीं ? सर्वच रोगांत एकरसाची एवढी गरजही नसते, परंतु २८२