पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ वैद्यकी. बाजूही होती, व त्याच्या जोडीस त्यांच्या अनुभवाचें शेंकडो रोग्यांचे पुरावे होते; त्यांचे अंशतःही प्रतिपादन करणे शक्य नाही. सबंध पाश्चात्य वैद्यकाची चिकित्सापद्धति पाहिली तर वीजतः रोग नाहींसा करून शरीर प्रकृतिस्थ करण्यापेक्षां व रक्तपरमाणूंचा रोगनाशक धर्म तीव्र करण्यापेक्षां, कोणीकडून तरी तात्पुरतें आरोग्य उत्पन्न करण्याकडे त्याचें धोरण असतें. त्यामुळे इंजेक्शन सारख्या उपायांनीं रोगनाशाबरोबरच उत्पन्न झालेला रक्तदोष घालविण्याचीही त्यांत कांही योजना नसते. पुण्यास इनॉक्यु- लेशनच्या वेळी वाद झाला होता, त्यावेळेस देखील अखेरीला, अण्णासाहेब यांनी काढलेल्या शंकांचे समाधान न करतां आल्यामुळे *** साहेबांस अजून आमचे प्रयोग चालू आहेत, त्यामुळे निश्चितपणे आपल्या प्रश्नांना उत्तरें देतां येत नाहीत,' असेच म्हणावे लागले. इंजेक्शन्स व ऑपरेशन्स यांच्या प्रमाणेच प्राणिज चिकित्सेसंबंधींही त्यांस मनापासून तिटकारा होता. व तो केवळ निर्मासतेकरितांच नसून वैद्यशास्त्राचे दृष्टीनेंच होता. 6 स्वतः ते तर काष्टीषवींशिवाय इतर द्रव्यांचा उपयोग करीतच नसत म्हटले तरी चालेल. माला, भस्मे वगैरे आर्यचिकित्साशास्त्रांतील इतर प्रका- रांची गुणकारिता अधिक तीव्र, सुलभ, व शीघ्र असूनही त्यांचा ते उपयोग करीत नसत, याचे कारण इतकेंच को ती तयार करतांना शास्त्रीय पद्धतीनें मोठ्या कसोशीनें व खर्चानें तयार करावी लागतात; त्यामुळे इतर कोणाची औषधें जशी पाहिजे तशीं झालेली नसल्यास अपाय होण्याचा संभव जास्त. व यांचें धोरण तर, उपाय लागूं पडला नाही तरी चालेल, पण अपाय होऊं नये, असे असे. म्हणून त्यांनी काष्टौषधींचा हा थोडा दगदगीचा, व दिरंगाईचा कां होईना, परंतु अतिशय सौम्य, स्वस्त व कमी धोक्याचा मार्ग पत्करिला होता. तसेंच कोणाचे अगदी खात्रीचे औषध असले, तर घ्यावयास सांगत नसत असें नाहीं. व प्रवाळ भस्मासारखें सौम्य औषध सांगतही. भस्मासंबंधों त्यांचा एक अनुभवही प्रसिद्ध आहे. बाबासाहेब यांच्या एका दुखण्यांत अण्णासाहेब लक्ष देईनात म्हणून नाना- साहेबांनी घावरून कोणच्याशा एका वैद्याचें औषध आणलें, व सांगितल्या- प्रमाणें मधांतून तें देत असतां वाटीच्या कांठावर हिरवटपणा आलेला त्यांनी पाहिला. त्यामुळे त्यांनीं तें औषध अण्णासाहेबास दाखविलें व 'देऊं कां"