पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या पंसतीचा व्यायाम; नमस्कार. २७७ म्हणून विचारिलें. 'हें कोठून आणलें ?' असे विचारून अण्णासाहेब यांनी वार्टीतील औषध फेंकून दिलें, व पागोटें चढवून तसेच त्या वैद्यांचे घरों गेले. नुकतेंच औषध नेलेलें होतें, व पाठोपाठ अण्णासाहेब आलेले पाहिले, त्यामुळे वैद्यबोवांसही थोडेसें धस्स झाले. परंतु यांनी चिरंजीवांची तब्वेत ठीक अस ल्याचे सांगून त्यांनी जें भस्म दिले होतें, ते कोणी केलें वगैरे चौकशी केली, व आणखी भस्म मागितले. तेव्हां वैद्यबुवांसही संतोष होऊन त्यांनी पुष्कळसे काढून दिले. परंतु तेवढ्यानेंच समजूत न झाल्यासारखें करून अण्णासाहे यांनी सवंधच भस्म मागितलें, आणि त्याच्या म्हणण्याकडे फारसें लक्ष न देतां संबंध बाटलीच घरी आणली. घरी येतांच त्यांनी तें भस्म गटारींत सांडून टाकलें, व एका गृहस्थाच्या हातीं त्याची किंमत पाठवून दिली. भस्माची भट्टी नीट न साधल्यामुळे तें अपायकारक झाले होतें, पण तसें सांगितलें तर त्याला वाईट वाटेल म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारला, व तें अपायकारक भस्म इत- रांच्या पोटांत जाऊं नये, अशीही व्यवस्था केली. सर्व बाबतीत अशीच त्यांची वागण्याची तरहा असे. असो. यावरून ते काढेच कां देत हैं लक्षांत येईल. तसे पाहिले तर, कोणींही औषध घ्यावें, याचाच त्यांना मनापासून कंटाळा येई. होतां होईल तो आहारविहारादि स्वाभाविक गोष्टींनींच प्रकृति नीट ठेवावी, औषधाचे कामच पडू देऊं नये, हें त्यांस मनापासून आवडे. साधी राहणी, आरोग्यनियमांचें परिपालन व योग्य व्यायाम यांच्या योगानें वैद्याचें तोंड पाहण्याचें कधींही काम पडणार नाही, असे ते म्हणत. व्यायामांत नमस्कारांचा व्यायाम इतर सर्व प्रकारांत त्यांना अधिक पसंत होता. इतर कोणच्याही व्यायामानें शरीरावर जो परिणाम होतो, तो चिरकाल रहात नाहीं, आणि व्यायाम सुटतांच शरीर ढिले होतें. परंतु नमस्कारांच्या योगानें स्नायूंस बसलेला पीळ थोडाबहुत अखेरपर्यंत कायम राहतो. याशिवाय इतर दृष्टींनींही नमस्काराचा व्यायाम सोपा व सोईचा आहे खावयास पुरेसें मिळत नाही म्हणून व्यायाम चांगला घेतां येत नाहीं अशीही एक तक्रार आढळते; परंतु अण्णासाहेब अर्से सांगत असत की आपण जें तूप खातों तें बहुतेक सर्व तसेंच बाहेर पडतें. त्यांतील कांहीं थोड्या भागाचा वंगणासारखा उपयोग होतो. एक तोळा तूप पचविण्यास २५० नमस्कार घालणें अवश्य आहे. यावरून पाहतां क्वचित् कांहों प्रमाणांत खरी असली तरी ' खावयास