पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतेंत वैद्यशास्त्राचें मूलसूल. २७५ क्वचित् कांही रोग सोडले तर व आगंतुक कारणाने शरीरांत उत्पन्न झालेली कांहीं तोडमोड असली तर चीरफाड करणे ही गोष्ट वेगळी. परंतु आमांशा- पासून तो राजयक्ष्म्यापर्यंत वाटेल त्या व्याधीकरितां दे क्लोरोफार्म की टाक चिरफाड करून, असल्या उपचारपद्धतीला ते पशुचिकित्सा म्हणत, व सृष्ट- पदार्थातील रोगनाशक धर्माच्या अज्ञानाचें तें लक्षण समजत, व इंजेक्शन्स इनॉक्युलेशन्स वगैरेंच्या तर ते तत्त्वतःच अतिशय विरुद्ध होते. एकदां त्यांना अडविण्याकरितां म्हणून एका डॉक्टरांनी त्यांस असे विचा- रलें कीं 'इंजेक्शन्सचीं जर कल्पनाच पूर्वी नव्हती, तर आर्यवैद्यकास ती •विरुद्ध आहे, असें तरी कसें म्हणावें ? कदाचित् आर्यवैद्यकानें मान्यही केली असती." यावर गीतेंतील पंधराव्या अध्यायांतील ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । मनः षष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ या श्लोकाच्या आधारें सुमारें दोन अडीच तासपर्यंत निरूपण करून या श्लोकांतून आर्यवैद्यकाचीं सारी मूलतच्चें कशीं निघतात व त्यांअन्वयें इंजेक्शन्स वगैरे अस्वाभाविक उपचार आर्यवैद्यकास विरुद्ध कसे आहेत, वगैरे त्यांनीं समजवून सांगितले. मनासह इंद्रियें प्रकृतिस्थ असतील तर जीवात्मा तें शरीर चालवितो, व तसे नसल्यास शरीर सोडून जातो, म्हणजे शरीरास मृत्यु येतो. अर्थात् कसलीही भानगड उत्पन्न झाली असतांना शरीर पुन्हा प्रकृतिस्थ करणें हें सान्या वैद्यकाचें सार आहे. अर्थात् तें पुन्हा प्रकृतिस्थ करतांना त्याच्या मूळ प्रकृतीस अनुकूल असे उप- चार झाले, तरच तें खरें प्रकृतिस्थ होईल. एकाया रक्तास विजातीय अशा द्रव्यानें त्यांत विकृति नाहींसा करण्याचा घर्म जरी उत्पन्न झाला तरी ते रक्त अखेरीस विकृतच राहणार, व त्यामुळे प्रकृतिस्थ शरीराच्या साह्यानें जीवात्मा जें करूं शकेल, तसें कर्षण त्यास करितां यावयाचें नाहीं; म्हणजे अर्थातच प्रकृतिस्थ शरीराच्या द्वारें जें त्यास संपादावयाचें असतें, तसें संपादितां येणार.. नाहीं. अशी त्यांच्या विवेचनाची तात्त्विक सरणी होती. याशिवाय एक रोग बरा करावयास टोचून घेतलेल्या द्रव्यानें तो रोग जरी अजीबात बरा झाला, असें धरलें तरी रक्तावर इतर अनिष्ट परिणाम कसे घडतात, वगैरे वैद्यशास्त्रीय,