Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैद्यकी. उमरावती येथील प्रसिद्ध वकील रा. बाबासाहेव पाळेकर यांस लेग होऊन सपाटून ताप भरला, कैरीसारखी गांठ येऊन प्लेगविषयीं कोणास शंका राहिली नाही. आणि कांहीं काळ त्यांची स्थितीही अत्यवस्थ होती. परंतु प्लेगवरील इतर कांहीं उपचार करण्याचें टाकून अण्णासाहेबांनी त्यांना सॅटो- नाइन व एरंडेल हेच आधीं दिले. त्यानंतर त्या दिवशीं प्रकृति अतिशयच विघडून त्यांस वात झाला. अण्णासाहेब यांस सांगितले असतां शांतपणाने ' होऊं दे वात झाला तर, पण एरंडेल लागूं पडलें का | ' म्हणून ते विचा- रीत. अखेरीस दुसरे दिवशीं मागल्या पहांटेस त्यांस भला मोठा जंत पडला, व तेथपासून त्यांच्या प्रकृतीस उतार पडला. मग अण्णासाहेब यांनींही लेग- वरील इतर उपचार करून गांठ कापून काढविली. २७२ या तर अगदींच क्षुल्लक गोष्टी आहेत, अगदी अलीकडच्या, सहज तोंडाशी आल्या, म्हणून दिल्या. वैद्यकामध्ये अनेक तऱ्हेच्या परीक्षा सांगितल्या आहेत, नाडीपरीक्षा, मुखपरीक्षा, वगैरे अनेक प्रकरांपैकी यांची दृष्टिपरीक्षा खरोखरच अद्भुत होती. एकाद्या मुलीस दिवस राहून केवळ दहा पंधरा दिव साचाच काल लोटला असला तरी सूक्ष्म अवलोकनानें अथवा प्रसंगी नाडी पाहून 'तुला औषध कसले द्यावयाचें ? ' म्हणून तिची थट्टा करीत, अथवा मोठी स्त्री असल्यास दिवस असल्याचे स्पष्ट सांगत. तरुण विद्यार्थी आले असतां त्यांच्या हाताच्या स्पर्शावरून 'तुला औषध कसले द्यावयाचें ? आधीं तुझे हात बांधले पाहिजेत, संध्या कर, नमस्कार घाल, छत्र्याच्या शाळेत जाव- याचें सोडून दे,' म्हणून सांगत. छत्र्याची शाळा म्हणजे माटेकरांचें दुकान. तेथें पूर्वी माडीवर नारायणराव छत्र्यांचा दवाखाना असून खालीं कसलीशी शाळा होती, तेव्हांपासून छत्र्यांची शाळा म्हणून त्यांच्या तोंडांत जे शब्द बसले होते, ते तसेच होते. पुढें तेथें माटेकराचें फराळाचें दुकान झाले तरीही अण्णा० त्याला छत्र्याची शाळाच म्हणत. असो. अशी अनेक उदाहरणे आहेत की अण्णा० यांनी रोगाची सूचना द्यावी, व पुढें कैक वर्षांनी तो उद्भवावा. त्या सगळ्यांचा नुसता नामनिर्देशही करणे शक्य नाहीं. यांच्याकडे येणाऱ्या रोग्यांचे मुख्यतः चार वर्ग असत. हे कधीं पैसे घेत नसत, तेव्हां जरा कांही झाले कीं चला अण्णासाहेबाकडे, अशा पुण्यांतील लोकांचा एक वर्ग. हा अर्थातच फार मोठा असावयाचा. यामधें अनेक तऱ्हेचे (