पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निदानकौशल्याचें उदाहरण. २७१ वाढल्या, असे सर्वास वाटलें, परंतु डॉक्टरनी सांगितले तेव्हां इलाज काय ? ऑपरेशन करावयाचे ठरले. पण जुलांची स्थिति तर अशी होती की, तिच्या अंगास बोट लावणेही शक्य नव्हते. त्यामुळे तिची आजी कांही ऑपरेशनला तयार होईना. अशा स्थितीत काय करावें, म्हणून अण्णासाहेब यांस ती विचारावयास आली. अण्णासाहेब यांनी सर्व प्रकार पाहून तिला सांगितलें कीं ' ऑपरेशन करवूं नकोस, इतक्या नाजूक स्थितींत तिला सोसणार नाहीं. एवीतेवों मुलगी तर गेल्यासारखीच आहे, तेव्हां मुकाट्यानें सांगतों तसे कर. मग पुढे काय महाराजांची इच्छा असेल तसे होईल' तिनें तें पत्करल्यावर अण्णासाहेव यांनी तिला पुढीलप्रमाणे उपचार करण्यास सांगितले. एक दिवस रात्री सँटोनाइन द्यावयाचें एक दिवस मधें जाऊं द्यावयाचा, व तिसरे दिवशीं सकाळी एरंडेल द्यावयाचें पुन्हा दुसरे दिवशीं सॅटोनाइन, व एक दिवस टाकून एरंडेल द्यावयाचें. आणि एरवीच्या वेळा वावडिंग सुंठ आणि कडुनिं- बाची पानें यांचा फांट मधून मधून घोंट घोंट पाजावयाचा व नेहमी येऊन प्रकृतिमान कळवावयाचें. याप्रमाणे उपचार सुरू झाला. एवढ्या मोठ्या रोगा- वरील हा असला उपचार पाहून सर्वांस मोठी मौज वाटली, व 'अण्णासाहेब यांच्या नादी तुम्हीं काय लागलांत,' म्हणून सर्व लोक आपापल्या परीनें म्हातारीचा वुद्धिभेद करूं लागले. त्यामुळे मधून मधून तिचें मन अस्थिर होऊन तिनेही अण्णासाहेबांस खूप त्रास द्यावा. इतके दिवस गेले अजून गुण नाहीं, ' ते अमुक डॉक्टर असे म्हणत होते,' वगैरे ठराविक तक्रारींना 'हो हो, आतां चार दिवस गेले कीं गुण येईल, शनवार गेला की उत्तम औषध देतों, मुलगी जगते आहे, हाच औषधाचा गुण आहे' इत्यादि शब्दांनीं केव्हां ममताळूपणानें, केव्हां चिडल्यासारखें करून अशा रीतीनें अण्णासाहे- वांनी सहा महिने लोटले ! सर्वांचीच खात्री झाली कीं रोग असाध्य आहे, म्हणून अण्सासाहेब असें करीत आहेत. असें होतां होतां सुमारें सहा महि- न्यांनंतर त्या मुलीस जंत पडूं लागले. व ते इतक्या प्रमाणानें दोनही द्वारां- तून पडूं लागले की घरांतल्या माणसांचे अन्न बंद होण्याची वेळ आली ! अशा स्थितीत दोन महिने गेल्यावर त्या मुलीचें पोट साफ बरें झालें, व ती हिंडूं फिरूं लागली. तरीही जंताची प्रवृत्ति नाहीशी होण्याकरितां त्यानंतर दोन वर्षेपर्यंत उपचार चालू ठेवलाच होता. 1 h