Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचेकडे येणाऱ्या रोग्यांचे चार वर्ग. २७३ लोक अनेक हेतूंनी आलेले असत. व आल्यासारखें उगीच हात दाखवून जात. कोणी मौज पाहण्याकरितां, कोणी यांचे दर्शनाकरितां, कोणी तेथें काय चालले आहे याची बातमी ठेवण्याकरितां, कोणी दुसऱ्या कोणावरोवर आला म्हणून, असे अनेक लोक जरा कुठे पडसे आलें, उगीच आंग ऊन झालें कीं, हात पुढे करीत. व यांनीही वाटेल तितका त्रास झाला तरीही कधीं कोणास नाहीं न म्हणतां प्रत्येकाशा थोडेबहुत बोलून कांहींना कांही तरी औषध सांगावें. अर्था- तच अशा प्रसंगी त्यांना कधीं थोडाही विचार करण्याचे कारण नसे, औषधही खरोखरच समजुतीदाखलच असे. याच्या उलट दुसरा वर्ग असा असे कीं, सर्व प्रकारच्या अतिक्रमांनी जर्जर झालेले शरीर आणि विकोपास गेलेली व्याधी व अनेक पद्धतीचे उपचार आणि अनेक वैद्य डॉक्टरांची निराशा हीं पदरांत घेऊन प्रकरण असाध्य ठरलें म्हणजे त्यांस अण्णासाहेब यांचेकडे आणून टाका- वयाचें. या रोग्यांची स्थितिच' शंकरो यदि रक्षिता' अशी झालेली असे, तेथें अण्णासाहेब तरी काय करणार ? तरी पण तोंडांतून अशुभ काढण्याचा त्यांच्या वाणीस संस्कारच नसल्यामुळे ते भरपूर आशा देत, व योग्य तो उपचारही करवीत. या दोन वर्गातील लोकांचा भरणाच त्यांचेकडे अधिक असे; व त्यामुळेच त्यांच्या वैद्यकीविषयीं विद्वान म्हणविणाऱ्या लोकांत अनेक गैरसमज असत. पुष्कळ रोग्यांचा रोग साध्य असे व त्यांचे निदान ठरवून कुशलतेनें चिकित्साही ते सांगत; परंतु पथ्य वगैरे सर्व भानगडी नीट न केल्यामुळे अखेरीस त्यांत यश येत नसे. या तीनही वर्गांच्या मानानें पुष्कळच थोडा असा एक चौथा वर्ग होता यांतील लोक मात्र सांगितल्याप्रमाणें औषध घेऊन रोगमुक्त होत, व जन्मभर अण्णासाहेब यांस धन्यता देणारे असे हजारों लोक आजही आहेत. अण्णासाहेब यांच्या वैद्यकीचें खरें स्वरूप व माहात्म्य लक्षांत येण्यास रोग्यांचें हें वर्गीकरण लक्षांत ठेविलें पाहिजे. म्हणजे त्यांच्या योजनापद्धतींतील विशेष लक्षांत येतो. हात पहावयाचे टाकून, अथवा उपचार सांगावयाचें सोडून पांच पांच दहा दहा मिनिटें रोग्याशी ते अवांतरपणानें उगीच बोलत बसलेले दिसत, व .त्याचें बाकीच्या लोकांस मोठें नवल वाटे. हात पहावयाचा फार झाले तर कांहीं थोडी माहिती विचारावयाची, तें सोडून ' तूं राहतोस कुठें ? करतोस १८