Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैद्यकी. २७० विलायतेहून आलेले डॉ. देशमुखांसारखे M.D. यांनीही निराश होऊन त्यांचा रोग असाध्य आहे. व फार झाले तर त्या महिन्या दोन यहिन्याच्याच सोबती आहेत, म्हणून ठरविलें होतें. शेवटीं श्री० दादासाहेब यांनी त्यांना अण्णासाहेब यांचेकडे आणून टाकिले. अण्णासाहेब यांचा त्यांचेवर लोभ होता, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. त्यांनी औषध द्यावयाचें कबूल केलें, व त्यांच्या म्हण ण्याप्रमाणे वर्ष दीडवर्ष काढल्यावर सौ० मनुताई यांची प्रकृतीही चांगली झाली आज त्यांची प्रकृति अगदी सुंदर असून त्या प्रसंगाचे स्मारक म्हणूनच को काय त्या अजूनहीं दुधावरच राहतात व फलाहार करतात. यांतली सांगण्या- जोगती गोष्ट एवढीच आहे की अण्णासाहेब यांनी त्यांना मुख्यत्वेंकरून लिव्हर वरचेंच औषध दिले होतें, व तसें त्यांनी मजजवळ स्पष्ट बोलूनही दाखविलें होतें. रा. आपटे यांचे कुटुंबास बहुत दिवसांनंतर दिवस राहिले. परंतु तें समजण्यांत न आल्यामुळे त्यांस कांही तरी रोग झाला आहे, असे वाटून पुण्या मुंबईच्या मोठमोठ्या सर्व वैद्य व डॉक्टरांस दाखविलें; आणि प्रत्येकानें कांहीं तरी वेगळें निदान करून काथ्यामेथ्यापासून तो थेट चीरफाडीपर्यंत सारे उपाय सुचविले. आपटे यांचे पुतणे रा. लक्ष्मणराव ऊर्फ बापूसाहेब हे अण्णासाहेब यांचेकडे येणारे असत त्यांचेवरोवर बाई अण्णासाहेब यांस प्रकृति दाखविण्यास आल्या. उभ्याउभ्यांच दारांत गांठ पडली, व बापूसाहेब यांनी त्यांच्या प्रकृतीची हकीकत व डॉक्टरांची मतें सांगि- तलीं. तेव्हां एकदां त्यांच्याकडे नीट पाहून अण्णासाहेब यांनी सांगितलें कीं, ‘ वेडे आहेत वेटे सारे यांना औषध नऊ महिन्यानंतर देऊं.' हें अनपेक्षित परंतु चिरवांछित निदान ऐकून बाईस पराकाष्ठेचा हर्ष झाला. पुढें यथाकाली प्रसूति होऊन रा. आपटे यांस एक कन्या झाली. जंतांची गोष्ट ती मुलगी मला दाखवून त्यांनी स्वतःच सांगितली. तिच्या ओटीपोटांत साधारण लहान नारळाएवढा गोळा होऊन ती अगदीं आसन्न- मरण झाली होती. नांवें कांहीं आतां नक्की लक्षांत नाहीत, परंतु असे म्हणतां येईल कीं, पुण्यांतील लहानमोठ्या सर्व डॉक्टरांनी Adnormal develap- ment of ovaries ( अंडफलकांची भलतीशी वाढ ) अर्से तिच्या रोगाचें निदान ठरवून ऑपरेशनशिवाय इलाज नाहीं, असा निश्चय केला होता. नऊ वर्षांचें मूल तें काय आणि तिच्या Ovaries एवढ्या कशा