पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचे निदानकौशल्य. २६९. साधारण अशा अपायांवरही पाश्चात्य पद्धतीत मुळींच उपाय योजना नाहीं, व कित्येक प्रसंगी ती कशी लंगडी पडते, हे त्यांनी डॉ० स्मिथच्या गळीं चांग- लॅच उतरून दिले होतें. त्यांतील एक उदाहरण आम्हांस माहीत आहे. वाघाच्या विषावर म्हणून कांहीं स्वतंत्र योजना त्या पद्धतीत नाहीं. तशा तऱ्हेचा एक रोगी अण्णासाहेब यांनी हटकून बरा करून दाखविला होता. वैद्यशास्त्रांत खरोखर महत्त्व म्हणजे निदानाचेंच. एकदां निदान ठरलें म्हणजे चिकित्सा करणें शास्त्र जाणणारा कोणीही करूं शकेल. त्यांत देखील कौशल्य नाहीं असें नाही. परंतु किती झाले तरी तें गौण आहे, आणि अण्णा- साहेबांच्या वैद्यकचातुर्यांतला मुख्य गुण म्हणजे त्यांचें निदानकौशल्य किती रोगी त्यांचेकडे येत, व त्यांतले किती बरे होऊन जात, हा प्रश्न कांही मोठासा महत्वाचा नाही, कारण रोग्याचें बरें होणें हें कांहीं वैद्याच्या निदानावर अथवा चिकित्सेच्या चांगुलपणावरच अवलंवून नाही. त्याचा बराचसा भाग रोगाची साध्यासाध्यता, रोग्याचे प्रकृतिधर्म व स्वभाव, त्याची शुश्रूषा, अशा बऱ्याच अवांतर गोष्टींकडे असतो. म्हणून त्या दृष्टीनें इतके लोक अण्णासाहेब यांचेकडे येत, म्हणून त्यांच्या वैद्यकनैपुण्याची तारीफ करणें, म्हणजे कांहीं खरें गुण- गौरव नव्हे. पुन्हा, असे होतें कीं, कांहीं थोडे अपवाद सोडले, तर, अण्णा- साहेबांचा रोगी म्हटला म्हणजे एकदां औषध घेऊन गेल्यावर त्यांच्या देख- रेखेसाठी असा कधी नसावयचाच. त्यामुळे चिकित्सा करतांना अण्णासाहेबांस नेहमी उपाय न झाला तरन होवो, पण अपाय खास होणार नाहीं, अशा री- तीनें भीतभीत औषधयोजना करावी लागे. त्यांचें औषध पुष्कळ दिवस घ्यावें लागे, याचें हेंहि एक कारण होतें. त्यामुळे यांना औषध विचारून जाणारेच पुष्कळ असत, परंतु टिकून घेणारा मात्र क्वचित असे. निदानासंबंधाच्या अद्भुत अशा शेंकडों गोष्टी आहेत की, त्याचा या त्रोटक चरित्रांत अधिक त्रोटकपणानें उल्लेख करणेही शक्य नाही. अग दींच साधी परंतु अगदी अलीकडील उदाहरणें सांगावयाची म्हणचे श्री. दादासाहेब खापर्डे यांच्या थोरल्या सुनेचें, प. वा. रा. हरी नारायण आपटे यांच्या कुटुंबाचें, एका मुलीच्या जंताचें वगैरे होत. सौ. मनुताई यांस क्षयाची भावना झाली असे सर्व वैद्य व डॉक्टर यांनी ठरविलें होतें, व त्याप्रमाणे सर्व लक्षणें असून त्यांची दशाही अत्यवस्थ झाली होती. मोठमोठे नामांकित वैद्य क