पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या तीन लोकविलक्षण गोष्टी. २५७ अण्णासाहेबांचे आयुष्य तीन गोष्टींत इतर लोकांचे आयुष्याहून निराळें होतें. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना जेवण नव्हते. सकाळी सात वाजल्यापासून त्यांचेकडे माणसें यायला लागत आणि तीं बहुशः रात्री ९९१० वाजेपर्यंत. असत. त्यांच्या काळांत ते माणसांनी अगदी वेढलेले असत. त्यांचेकडे येणारी माणसें म्हणजे कांहीं कायद्याचे कामाकरितां, बरीचशी औषधाचे सल्लघाकरितां, " कांही ते “ साधु म्हणून त्यांचे दर्शनाकरितां व बाकीचीं सार्वजनिक कामा- करितां असत ! ह्या सार्वजनिक कामांतच राजकारण, म्युनिसिपालिटी वगैरे विषय येत. कै. महादेव गोविंद रानडथांपासून तो शंकरराव लवट्यांपर्यंत सर्व माणसें त्यांना मानीत व त्यांचेकडे येत ! ना. गोखले, लो. टिळक हेही त्यांचे- कडे जाऊन त्यांची सल्ला घेत. पण अण्णासाहेबांचें वर्तन सर्वांशी सारखें असे. त्याच माडीवर व त्याच सत्रंजीवर त्यांचे सर्व व्यवहार चालत. मग ते रानडे असोत, टिळक असोत गोखले असोत किंवा पोटदुखीनें विव्हळणारा एखादा गरीब मनुष्य असो. 66 अण्णासाहेबांच्या स्वभावांत " नाहीं " हा शब्द नव्हता. कोणी केव्हांही आले आणि कितीही वेळ बसले तरी ते त्यास 'नको' असे कधीं म्हणत नसत. त्यामुळे एकएक मनुष्य तासासाठी म्हणून जरी आला तरी अण्णासाहे- बांना एकसारखी तांगड पडे | एखादे वेळीं ही तांगड इतकी होई कीं दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्यांना जागेवरून उठतां येत नसे. ह्यापुढे त्यांचें स्नान व पूजा ! त्यांसही भरपूर वेळ देऊन पुन्हा माडीवरील दिवाण- खान्यांत ते हजर होत व तेथून रात्रीं अगदी शेवटचा मनुष्य निघून गेला म्हणजे पुन्हां स्नानाला व रात्रीच्या पूजेला उठत ! ह्या कार्यक्रमांत जेवायला वेळ मुळींच नव्हता हे वाचकांचे लक्ष्यांत आलेंच असेल ! रात्री ९/१० वाजतां लोकांचे गर्दीतून ते मोकळे झाले म्हणजे पुढे स्नान करून ते पोथी-पूजा वगैरे करीत आणि मग डोक्यावर पागोटें ठेवून व बाहेर जायचा पोषाख करून देवदर्शनाला निघत ! हे त्यांचें देवदर्शन पहांटे ५ वाजेपर्यंत चाले. पहांटे पांच वाजले म्हणजे ते घरीं परत फिरत ! व त्यांचेकरितां एक गादी पसरून ठेवलेली असे त्या गादीवर विश्रांतीकरितां जात ! पण ह्यांत निद्रेचा भाग कितीसा असे हा प्रश्नच आहे.. कोणी म्हणत हृ