Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५६ साक्षात्परिचय ' कायद्याचें ज्ञान द्रव्यार्जनाकरितां व डॉक्टरी ज्ञान लोकोपकाराकरितां अशी आपल्या ज्ञानाची बरोबर वांटणी करून संसार व परमार्थ जोडीने करणारा त्यांचेसारखा विरळाच असेल ! आणि म्हणून केव्हांहि गेलें तरी व्याधिग्रस्त लोकांची त्यांचे घरीं गर्दी असे- ह्या व्याधिग्रस्तांत कांही लक्षाधिपतिही जात ! इतर डॉक्टर वैद्यांचें औषध थकले म्हणजे अखेरीस अण्णासाहेब पटवर्धनांकडे जाण्याची त्यांना पाळी येत असे. पण त्यांचेकडे कोणी लक्षाधीश गेला म्हणून त्याचे द्रव्यावर त्यांनी कधीही लक्ष्य ठेवले नाही. एखादा गरीब मनुष्य ज्याप्र माणे त्यांचेकडून फुकट औषध योजना घेऊन जाई त्याप्रमाणे लक्षाधीशासही त्यांचेकडून फुकट चिकित्साच करून घ्यावी लागत असे. कोणी त्यांना कोणत्याही स्वरूपानें पैसे देण्याचा प्रयत्न केल्यास ते अतिशय रागावत व त्या देणगीचा इनकार करीत ! ( कांचनाला इतक्या निरिच्छपणानें धुत्कारणारा सत्पुरुष कामिनीचे बावतीत किती निष्पाप असेल हे सांगावयास नकोच ! खरो संसारी असून - विवा हित व पुत्रकन्यावान् असून – स्वतःचे पैशानें संसाराचा गाडा चालवीत- असून स्त्रियांचे कामांत इतका निष्पाप पुरुष कधीं झालाच नसेल ! वाटेल त्या सुंदर स्त्रीनें त्यांचेजवळ जावें आणि आपल्या वाटेल त्या व्याधीची हकी- कत त्यांना सांगावी ! आण्णासाहेबांचे मनांत तिचेविषयी पापवासना कधींही उतन्न व्हावयाची नाहीं ! तिला असे वाटावें की आपले बापाजवळच आपण बोलत आहोत. अहो-- एखादे वेळी बापाजवळ बोलायलादेखील स्त्रियांना लाजच वाटत असेल पण अण्णासाहेबांचें वर्तन इतकें निर्मळ असे की तरुण स्त्रियांना आपल्या आईपेक्षां देखील त्यांचेजवळ मन मोकळें करावेंसें वाटे ! त्यांना महर्षि " ही पदवी खरोखरच शोभत होती ! पापी लोकांनी त्यांच्या पायांचें तीर्थ घेण्याइतकी त्यांची योग्यता होती ! (6

अण्णासाहेबांचे सर्व आयुष्यच सामान्य पद्धतीहून निराळें होतें. कनक आणि कान्ता ह्याचे बाबतीत इतका निर्मळ पुरुष पुण्यांत अनेक वर्षांत झाला नसेल हें आम्ही पूर्वी सांगितलेच आहे ! किंबहुना आम्ही पूर्वी म्हटल्याप्रमाणें राम- शास्त्रयांपासून तो आधुनिक कालापर्यंत इतका निःस्पृह पुरुष पुण्यांत झालाच नाहीं असें म्हणण्याला कांही हरकत नाही.