Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ ' साक्षात्परिचय ' कीं ते एक तासभर निद्रा घेत व कोणी म्हणत की ते योगासन घालून एकां- तांत बसत ! आतां ह्यापैकीं खरें कोणते हें त्या त्यांच्या जिवाला माहीत ! तें माहीत होणे शक्य नाहीं ! पण एवढी गोष्ट खरी की पुन्हा सकाळी सात वाजल्यापासून त्यांचा जो कार्यक्रम सुरू होत असे तो अगदी थेट पुन्हा पहांटे पांच वाजेपर्यन्त चाले | ह्यांत कोणतीही गुप्तता किंवा रहस्य नव्हते आणि कोणत्याही मनुष्यास तें सहज पाहून आपली खात्री करून घेतां येण्या- जोगी होती. अशा ह्या कार्यक्रमांत जेवायला जागा कुठे आहे ? घरांत त्यांची पत्नी असे, भाऊ असे, मुलगा असे-पाहुणे तर तोडून काढले तरी तुटायचे नाहीत इतके येत ! पण अण्णासाहेबांची न् त्यांची पंगत कधींहि होत नसे. ती होणें शक्यच नव्हतें. आदरसत्कारांत अण्णासाहेबांइतका दिलदार व उदार मनुष्य क्वचित् – पण तें स्वतः जर मुळींच जेवीत नव्हते तर पाहुण्यांबरोबर ते जेवा यला येणार कोठून ? त्यांचा भाऊ व मुलगा यांना त्यांचेशिवायच जेवायला वसावें लागे. व त्यांची पत्नी - ती फार साध्वी होती व सच्छीलपणानें त्यांच्या पवित्र आयुष्यांत आणखी पवित्रता घालीत असे—पण " जेवायला उठा " असें म्हणण्याची तिची प्राज्ञा नव्हती. ती रोज कांहीं दशमी व दूध त्यांचे नेमलेल्या ठिकाणी झांकून ठेवी- पण तेवढे देखील ते दोन दोन दिवसांत घेत नसत. दोन तीन दिवसांनी लहर लागली म्हणजे केव्हां तरी तेवढ्या अन्नाचा स्वीकार करीत ! एवढाच काय तो अण्णासाहेबांचा आहार 1 एवढ्या आहारा- वर त्यांनी आपल्या आयुष्याचीं निदान तीस वर्षे घालविलों शेवटी शेवटीं तर आहार याहीपेक्षां संपुष्टांत आणला ! सर्वांच्या आयुष्याहून अण्णासाहेबांचे आयुष्य जें भिन्न होतें त्यांतली पहिली गोष्ट म्हणजे ही आहाराची होय. केवळ दुग्धपानावर निर्वाह करणाऱ्या - ४० दिवस उपास पाळणाऱ्या - नुसतें गोमूत्र प्राशन करून पुरश्चरण कर- णाऱ्या अनेक बोवाजींच्या गोष्टी आपण ऐकतों. त्या खऱ्या असोत किंवा खोट्या असोत ! आपल्याला इथें त्यांच्याशी कांहीं करावयाचें नाहीं. पण अण्णासाहे- बांचे आयुष्य खुलें होतें - उघडें होतें- कुणालाही पाहतां येण्याजोगें होतें. तें पाहून त्यांच्या निराशित्वाबद्दल खात्री करून घ्यायला कोणालाही अडचण नव्हती..