Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोल्हटकरांचे वर्णन. २५५ तेवढेच कार्य निसर्गरमणीय महाराष्ट्र शारदेसंबंघीं यानें केलें, म्हणजे झालें. असो. अण्णासाहेब यांच्या सहवासांतील कोणत्याही व्यक्तीला आम्ही सांगितल्या- प्रमाणेच साधारण अनुभव आला असता, मग ती कशाही स्वभावगुणधर्माची, व संस्कारांची असो, याचें दिग्दर्शन म्हणून एक उदाहरण येथे मुद्दाम द्यावेंस चाटतें. संदेशकर्ते रा. अ. ब. कोल्हटकर हे प्रसिद्धच आहेत. अशा गृहस्थानेही अण्णासाहेब यांच्याविषय काय लिहिलेले आहे, हे पाहिले म्हणजे एकाद्या देवभोळ्या खुळ्या माणसाच्या दृष्टींतून पहा, अथवा अगदी पूर्ण अर्वाचीन दृष्टींतून पहा, अण्णासाहेब यांचें चारित्र्य धवलगिरीसारख्या नजर न ठरणाऱ्या उंच उंच शिखरांनी सारखें झळकत असलेले दिसतें, ही गोष्ट उघड होईल, म्हणून आपल्या एका कादंबरीत रा. अच्युतराव यांनी आपाततः केलेले अण्णा- साहेब यांचे वर्णन थोडें विस्तृत असले तरी, जसेच्या तसे देऊन हा भाग आटोपूं. इतकें सुरस आणि सत्यपूर्ण वर्णन क्वचितच आढळेल. या उताया- बद्दल आम्ही रा. अच्युतराव यांचे फार आभारी आहोत. "पुण्यांत बरे वाईट अनेक लोक आजपर्यंत झाले- पण आण्णासाहेब पटवर्धनां- इतका थोर पुरुष आजपर्यंत पुण्यांत झाला असेल की नाही ह्याविषयीं संश- यच आहे | किंबहुना रामशास्त्रयांनंतर इतक्या वर्षांत या वर्तनाचा पुण्यांत हाच पुरुष निर्माण झाला असेल ! त्यांचेजवळ सर्वांना रिघाव होता. ते जुन्या मतांचे व कडक सोंवळ्याओवळ्याचे होते, तरी पण त्यांचे घरीं ब्राह्मणापासून अस्पृश्यांपर्यंत आणि पारशांपासून ख्रिश्चनांपर्यंत सर्वजण येत असत ! त्यांचा स्पर्शास्पर्श-त्यांचा विटाळचंडाळ- त्यांचा नेमधर्म हें सर्व त्यांचे खाजगी पूजागृहांत ! ते आपल्या दिवाणखान्यांत बसले म्हणजे तिथे सगळे सारखे ! मग तिथे त्यांचा गोंडस नातू असो, अथवा एखादें महाराचे पोर असो ! त्यांचेसारखा पवित्र वर्तनाचा पुरुष तर मिळणारच नाहीं | ते एल्. एल्. बी. व एल्. एम्. अॅण्ड एस्. अशा दोन्ही परीक्षांपर्यंत शिकलेले होते : पण आपल्या एल्. एम्. अण्ड एस् परीक्षेचें ज्ञान त्यांनी पैसे मिळविण्याचे काम खर्च कधींही केलें नाहीं ! एल्. एल्. बी. परीक्षेवर-वकिलीचें ज्ञानावर त्यांनी हजारों रुपये मिळविले- पण एल्. एम्. अॅण्ड एस्. च्या डॉक्टरी ज्ञानावर त्यांनी कपर्दिकही मिळविली नाहीं ! तें ज्ञान त्यांनी परोपकाराकरितां राखून ठेवलेले होते.