२५४. साक्षात्परिचय ' अतिशय हौस असे. व प्रक्रीडा करणान्या दिग्गजाप्रमाणें जेथें हवें तेथें थडक देण्यास त्यांचे डोकें सळसळत असे; व थोड्याबहुत प्रमाणानें निर्वीर मुर्वीतलम्, असे त्यांना वाटू लागतांच अण्णासाहेब यांच्यासारख्या वृद्ध पितामहाशी टक्कर घेण्याची त्यांना इच्छा होणें साहजिक होतें. व त्याप्रमाणे मोठ्या हौसेनें ते अण्णासाहेब यांच्याकडे गेलेही. त्या दिवशीं हात पाहण्याचा वार नसल्यामुळे अण्णासाहेब यांस खाली येण्यास फार उशीर लागला, व यांची वर्दीही वर न पोहोचल्यामुळे दीड दोन तास खाली चाकावरच बसून रहावे लागले. पुढे अण्णासाहेब खाली आल्यावरही त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे उभ्याउभ्याच त्यांनी यांची चौकशी केली, व त्यामुळे गुलावरावांनाही पुष्कळ वेळ उभेंच रहावे लागले. परंतु अण्णासाहेब यांच्या ते लक्षांतही येणें शक्य नव्हते. कारण आलेल्या माणसास मुद्दाम बसवून त्यांच्याशी गोष्टी करण्याइतका शिष्टा- चार त्यांच्या कधीं ध्यानांत रहात नसे, व सहज तास दोन तास उभे राहणें, म्हणजे कांहीं विशेष गोष्ट नव्हती. यांची हकीकत कळल्यावरही प्रत्यक्ष त्यांच्याशी यांचे असें कांहीं काम नसल्यामुळे ' ठीक ठीक' असे म्हणूनच यांना निरोप दिला. अण्णासाहेब कांहीं तरी बोलतील, व त्यावर शंका घेऊन आपण कांहीतरी बोलूं ही त्यांच्या मनांतील हौस तशीच राहून गेली. उमरावतीस परत आल्यावर वै० भाऊसाहेब असनारे यांच्याशीं बोलतांना त्यांनी अशी तक्रार केली की, 'असे कसे तुमचे 'अण्णासाहेब. ' दारांतच उभ्याउभ्या आमची भेट घेतली, आणि धड दोन शब्द देखील बोलले नाहीत. ' अशीच त्यांच्यावर पुष्कळ मंडळी नाराज होत असे. हेच गुलाबराव पुढे अण्णासाहेब यांचेकडे आले, व त्या वेळेला अण्णासाहेबही त्यांच्याशीं वेगळ्या रीतीनें वागले, `ती सारी हकीगत पुढें स्वतंत्र द्यावयाचीच आहे. असो. असे त्यांचें वर्णन करण्याजोगते अनेक गुण आहेत, परंतु त्याला स्थल काल विपुल पाहिजे, व वर्णन करणाऱ्याची रसवंतीही तशीच पाहिजे. या त्रोटक चरित्रांत अगदींच ठळक गोष्टींचे त्रोटकपणानेंच उल्लेख करण्यापलीकडे जास्त काय साधावयाचें आहे ? खन्या फुलाचा सुगंध आणि सौंदर्य कागदी फुलांत कोठून येणार ? त्यांतून हें तर बोलूनचालून भेंडाचें फूल. कागदी फुलांतील मार्दव देखील यांत येणे शक्य नाहीं. तरीपण त्याच्यायोगानें खऱ्या गुलाबाची कल्पना येते, आणि मधुराकृति सुंदरींचें सौंदर्यही खुलून दिसतें. 6
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७८
Appearance