पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्धनतेचें व्यसन. २५१ वाटेल तसे चालू झाले तेव्हां ' तू वेडा आहेस, तुझ्यासारख्या माणसानें असें बोलूं नये ' असे सांगून 'त्याला उपद्रव देऊं नका ' म्हणून जवळच्या लोकांस बजावून ते माडीवर गेले, व कांही लिहिणे सांगणें होतें तें पूर्ववत् करूं लागले. मग त्यांच्या चित्तावर या गोष्टींचा कांही देखील परिणाम उरला नाही. अशी विलक्षण नम्रता, आणि निखळ समता, पाहण्यास मिळणेही खरोखरच दुर्लभ आहे. हैं उदाहरण दिल्यानें कदाचित् कोणास वाईट वाटण्याचा संभव आहे. कारण अण्णासाहेब यांची स्थिति हलाखीची असे, असे सांगणें म्हणजे त्यांच्या दृष्टीनें अण्णासाहेब यांचा प्रत्यक्ष दुलौकिक करण्यासारखेंच आहे. परंतु ही विचारसरणी कोतेपणाची आहे, हे उघड आहे. कारण अण्णासाहेब यांच्या- सारख्या विभूतींच्या ठिकाणी संपत्तीच्या 'अलोटपणानें मोठेपणा येत नसून अशा हलाखीच्या स्थितींतच ' लक्ष्म लक्ष्मी तनोति, ' अशी त्यांची शोभा अधिक उमटून पडते. आणि म्हणूनच की काय अशा लोकांच्या मागें विधा त्यानें हें भूषण लावून दिलेले असतें, असा सार्वकालिक अनुभव आहे. मग असल्या विश्वकुटुंवितेत कुबेराचा खजीना असला म्हणून काय पुरा पडावयाचा आहे ? आणि ती पुरा पडला नाहीं, म्हणून काय लाघव यावयाचें आहे ? त्यांतूनही सर्व तऱ्हेची अंमली व्यसनें केवळ लीलेनें जवळ वाळगणाऱ्या शंकरा- प्रमाणें हें निर्धनतेचें व्यसन अण्णासाहेब यांनी तर खरोखरच कौतुकासारखें जवळ बाळगिलें होतें. आणि म्हणून त्याचें आम्हीही कौतुकच केले पाहिजे. एरवी, पैसा म्हणजे तर काय, त्यांच्या हातचा मळ होता. त्यांचे बंधु तर त्यांना नेहमी अजीजीनें म्हणत की 'अरे बाबा, तूं नेमानें एक तास रोज संसाराकडे देशील, तरी पैशाचा पाऊस पडेल.' परंतु तो एक तास त्यांनी तसा केव्हांही दिला नाहीं. ते स्वतःचं म्हणत असत की 'पैशाला काय कमी ? मी जर उद्योग केला असता, तर सारा वाडा सोन्यानें केव्हांच भरून टाकला असता. ' या उद्गारांत केवढे सत्य आहे, हे मागील चरित्रा- वरून लक्षांत येईलच. तिसरी गोष्ट अशी की, अशी जरी नेहमी हलाखी असे, तरी यांचा गृहस्थाश्रमी बाणा रसभरही कधीं ढळला नाहीं, व कोणच्य प्रसंगांत गृहस्थाश्रमी ऐटदारपणा कधीं टळला नाहीं. शेवटपर्यंत प्रपंच सारा त्यांच्याच अंगावर होता. व तो त्यांनी स्वतःच कमाई करून रेटला. त्या-