Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ 'साक्षात्परिचय' करितां कधीं कोणाच्या तोंडाकडे त्यांना पहावें लागले नाहीं. तेव्हां जाणून वुजून धारण केलेल्या श्रीविनायकाच्या वक्षःस्थलावरील या उरगवंधाकडे पाहून कोणाच्या अंगावर जर अनिवार शहारे येऊं लागले, तर ती एक विशिष्ट प्रकृति आहे, असे म्हणून सोडून देणेंच भाग आहे. एरवी कोणीही झाला तरी त्याच्याकडे कौतुकानेंच वोट दाखवील. त्यामुळे त्यांना कमीपणा न येतां उलट • त्यांचा अपरिग्रह मात्र जास्त खुलून दिसतो. पोटाचा उद्योग म्हणून ते चकिली शिकले होते, व पूर्वी सांगितल्याप्रमाणें डॉक्टरी त्यांच्या गळ्यांत पडली होती. वैद्यकावर जर पैसे मिळवावयाचें त्यांनी मनांत आणले असते, तर लक्षावधि रुपयांचा खरोखरच पाऊस पाडला असता. ब्राह्मणाने वैद्यकावर पैसे मिळवूं नयेत, अशी शास्त्राज्ञा असल्यामुळे त्यांच्या वडिलांनीही ' वकिलीवर चरितार्थ चालवावा आणि वैद्यकाचा उपयोग परो- पकारार्थ करावा,' असे सांगून ठेविलें होतें. ही आज्ञा त्यांनीं अखेरपर्यंत कशी कडकपणानें पाळली, तें प्रसिद्धच आहे. मोठमोठे धनिक हात दाखवावयास येत, व मोठ्या संतोषानेंही त्यांच्याकडून लाभ करून घेऊन गोरगरिबांस फुकट उपयोगी पडणे हेंहि त्यांस साधले असते. परंतु कोणाजवळून कांहीं घेण्याची गोष्ट तर असोच, ज्याला ओषध सुरू असे त्याच्याजवळून कांहीं घेणे तर असोच, पण त्याच्यायेथे नुसता पाण्याचा घोंट देखील ते घेत नसत. इतकेंच तर काय परंतु एकादें साधें फळ, अथवा एकादें केळ जरी कोणीं श्रीमहाराजांस नैवेद्य दाखवावयाच्या निमित्ताने आणले तर त्याचा नैवेद्य देखील आपल्या घरी न दाखवितां परभारें श्रीओंकारेश्वरावर तें वाटा- वयास सांगत. . असल्या कडक अपरिग्रहाने दिपून जाऊन, सहसा कोणी तसली गोष्ट काढी- तही नसे. परंतु पूर्वी त्यांना पैसा घ्यावयास लावावा, असे पुष्कळ प्रयत्न लोकांनी केले. सरदार बाळासाहेब नातु यांच्या मनांत एकदां असें आलें कीं कोणकडून तरी अण्णासाहेब यांस मोठी प्राप्ति करून द्यावी, व त्याप्रमाणें त्यांनी तशा तऱ्हेचा एक घाट घातला- श्री० जम्नाबाईसाहेब गायकवाड यांची कन्या ही त्याच वेळेला अतिशय आजारी होती. जम्नाबाईसाहेब तेव्हां पुण्यासच राहत असत. व त्यांनी बाळासाहेबांपाशी आग्रह धरला की कसेंही करून अण्णा- “साहेब यांचें औषध मुलीस देववावें, आणि बाळासाहेब यांच्याही मनांत, हें