पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० साक्षात्परिचय ' राहते. परंतु अण्णासाहेबांच्या ठिकाणी स्वतःचा दर्जा व दुसऱ्याची पात्रापात्रता या दोहोंचाही विचारच नव्हता असे दिसून येई. याचे कारण असे की त्यांच्या ठिकाणी विश्वकुटुंबतेची जाणीव सदैव इतकी जागृत असे कीं, आपण कोणाला कांही देत नसून ज्याचें त्याचें हक्काचेंच तो घेतो, तेव्हां त्याचा अभिमान तरी कसला धरावयाचा, आणि त्यांत पात्रापात्र तरी कसले पाहावयाचें ? व एकाद्या विशिष्ट रीतीनें कोणाची इच्छा पुरवितां आली नाहीं, म्हणून त्यांत सच्चभंग तरी कसला व्हावयाचा ? आईच्या अंतःकरणाला ज्याप्रमाणे मुलाचा हट्ट सोसत नाही, म्हणून केवळ ती त्याच्या इच्छा पुरविण्यास प्रवृत्त होते, त्यांत कांही दर्जा अथवा पालापाचता येणेंच शक्य नाहीं, तशी त्यांची स्वभावतःच मनो- रचना होती; आणि दुसरीकडून जसें एकाद्या कार्यप्रसंगी सर्वजण कोठीवाल्या- जवळ आपल्या वस्तु आणून टाकतात, व मागावयास आले म्हणजे तो त्यांना असेल नसेल त्याप्रमाणे भराभर वाटेला लावीत असतो, तशी त्यांची धारणा होती. 6 एकदा एका प्रसंगी असाच कांही विलक्षण योगायोग आला की यांच्या हाताशी केवळ एका चवलीपलीकडे त्यावेळी कांहींच नव्हतें, आणि एक हजरत मौला तर दाराशी येऊन उभे राहिले. बरें, त्यांचा सवालही कांही फार नव्हता; केवळ १॥ - २ रुपयाचाच प्रश्न होता. अगदी हाताशी नस- ल्यास कोणाकडून आणून देखील दुरुऱ्याची गरज भागवावयाची, असेही पुष्कळ वेळां होई; परंतु त्या वेळचा कर्मधर्मयोग असा होता की शाही सोय नव्हती. ज्या हातांनी चुटकीसरसे २१२ कोट रुपये उचलून ठेवावे, त्याच हातांनी, केवळ दीड दोन रुपयाकरितां आपल्या नांवावर आलेल्या एका फालतू माणसाचे हातावर केवळ एक चवली ठेवून आज एवढेंच आहे महाराज, ' असे म्हणण्याचा प्रसंग आला असतांनाही मनाची समता यत्किंचितही न ढळल्याचें पहावयाचें देखील नशीबांत पाहिजे. असाच विचित्र योगायोग तेव्हां घडून आला. परंतु दारी आलेल्या गृहस्थास त्याचें काय ? तो तर आपल्या ऐटीतच होता. त्याचा तो उर्मटपणा पाहून, बाजूच्या लोकांस तर स्वस्थ बसणें अशक्य झालें. परंतु यांनी मात्र उलट अतिशय नम्रतेनें ' अरे बाबा, यावेळी माझेजवळ जास्त नाहीं, मी अगदीं शपथ वाहून सांगतों, ’ अर्से त्याला सांगून पाहिलें. परंतु जेव्हा त्याचे तोंड (