पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दातृत्वाचा विशेष. यांनी प्राणपात केला म्हणजे संतोषानें निघून जावयाचें, असा त्याचा क्रम होता. २४९ कोठेंही काय थोर माणूस म्हटला की त्याच्याभोवती खर्चणाऱ्याचें खरचतें, आणि कोठवळ्याचें पोट दुखतें, अशी स्थिति असावयाची, त्याला इथेंच अप- वाद कोठून सांपाडवयाचा ? या असल्या देण्याचा व मिक्षेकरी लोकांच्या भग- रूरीचा आणि तऱ्हेवाईकपणाचा भोवतालच्या मंडळीस अर्थातच संताप येई; आणि दुसऱ्याचें अंतःकरण दुखवूं नये म्हणून हे तर पराकाष्ठेची काळजी घेत. अशा स्थितीत एकादें जास्त मागणी करणारें कुळ आले, आणि त्याला मुक्तहस्तानें कांहीतरी मोठें देणें देऊन टाकलेले कोणाच्या पहाण्यांत आलें, म्हणजे त्यांची जी कानकोंड्यासारखी स्थिति होऊन जाई, ती पाहिली म्हणजे त्या पराकाष्ठेच्या निरभिमानतेनें आणि सरलतेनें, पहाणारा मनुष्य विरून जाई व त्याला गंहिवर आल्यावांचून रहात नसे. एकाद्या प्रेमळ परंतु करज्या बा पाच्या उधळ्या मुलानें अगदीं नीटपणानें चालण्याचे कवूल करूनही कांहीं मोठा खर्च केला, म्हणजे तो जसा हळूच वडिलांची समजूत घालावयाचा प्रयत्न करतो, व तो खर्च अवास्तव झाला नसून उलट 'बरें झालें, थोडक्यांत प्रक रण मिटलें,' असे वाटून थोडेसें समाधान त्यांना होईल, अशा रीतीनें कांहीं तरी सांगतो, अशा तऱ्हेची कांहींशी यांची स्थिति होऊन जाई. “ आपला तो हा होता," अथवा "आपल्या त्या ह्याचा तो होता" असें कांहीं तरी हळू हळू म्हणत, एकाद्या कचाट्यांतून सुटावें तशी मुद्रा करून, "चला, एकदांचा १॥ रुपयावर तंटा तोडला,” असें पुन्हा पुन्हा सांगत, दुसऱ्याचीही मुद्रा संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतांना त्यांना पाहिले म्हणजे त्या अंतःकरणाच्या नवनीत- कोमलतेनें कोणाचें अंतःकरण भरून येणार नाहीं ? ६ दुसरेही दानशूरतेकरितां प्रसिद्ध असलेले अनेक महात्मे आहेत, व 'मृदु सबाह्य नवनीत' असल्या चित्तवृत्तीच्या भगवन्मूर्तीही कित्येक ठिकाणी अस- तील, परंतु सामान्यतः यांच्या व इतर दाते लोकांच्या दानव्यवस्थितीत असा मोठा फरक आढळून येतो कीं बहुतेक सर्व दात्यांचें दानत्व सरदारी बाण्याचें असतें; म्हणजे सदयता तर खरीच, परंतु त्यांत दानाचें तानमान, कांही स्वतःचा दर्जा, व कांहीं याचकाची पात्रापात्रता, वगैरे कित्येक धोरणांनी ठरतें, आणि म्हणून त्यांत एक प्रकारची आपला सत्त्वभंग होईल, अशी भीति