Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ ' साक्षात्परिचय ' सर्व करीत असतांही त्यांनी तें कोणाच्याही विशेषसें नजरेस कधीं येऊं दिलें नाहीं. घरच्या कर्त्या पुरुषाजवळ कुटुंनियांनी हक्कानें वस्तु मागावी, त्याप्रमाणे हे लोक हक्कानें व नेमानें येऊन वर सांगितल्याप्रमाणे काय हवें तें मागून घेत. श्रीमन्सहाराजांनी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांस कृतार्थ केल्यावर दानधर्माची आज्ञा केली, * व त्यांनी पुढें तें व्रत कशा रीतीनें चालविलें, हें प्रसिद्धच आहे. तेंच लोण धुळ्याचे बुवासाहेब व अण्णासाहेब अशा क्रमानें पुढे चाललेले दिसतें. मात्र एवढेच की अण्णासाहेब यांचें, इतर सर्व व्यवहारा- प्रमाणेच मुकाट्यामुकाट्यानें झालें. .त्यापासून अर्थातच त्यांना पुष्कल त्रास होत असावा; कारण आलेल्या लोकांनी वाटेल तशी मागणी करावी व त्यांच्याजवळ ते नसल्यामुळे, यांनी हात जोडून नम्रतेनें एकाद्या व्याह्याजांवयाप्रमाणे त्यांची समजूत काढावी, असा प्रकार पुष्कळ होई. शिवाय घरच्या मंडळीपासून लास होतो म्हणून कित्ये- कांची अशी मिजास असे की दाराशी यावयाचेंच नाहीं; म्हणून अण्णासाहेबांस कोठें तरी रस्त्यांत गांठून, अथवा रस्त्यावरूनच ग्यालरींत हांक मारून आपलें दैन्य कळवावयाचें, व मग त्याप्रमाणे जेथें ते असतील तेथें स्वतः जाऊन यांनी तें नेऊन द्यावयाचें ! पुष्कळ वेळां असे होई कीं, कोठें जात असतां दुकानांतून यांनी छली विकत घेतलेली समजे, परंतु ती कोणास नेऊन दिली हें मात्र कवींच कळत नसे. इतकें करून पुन्हां वर गृहस्थाश्रमी बाणा काय- मच असे. रस्त्यानें जर एकादा भिक्षेकरी भेटला, तर त्याला जे काय हाती येईल तें टाक, असे त्यांनी कधीं केलें नाहीं. सामान्य लोकांप्रमाणे एक दिडकी मात्र त्याच्या हातावर पडावयाची. मात्र घरी येऊन मागितले की हवें तें मिळे. एक वारकरी नेमानें दोन चार दिवसांआड रस्त्यांत हांक मारावयाचा. त्याला प्रत्येक वेळीं भला भक्कम शिधा, व रुपया आठ आणे कांहीं तरी देत असत. असाच एक दुसरा वोवा चार आठ दिवसांनी यावयाचा. केळीच्या पानावर दूधभातसाखर खावी व त्याच्या हातावर एक रुपया ठेवून अण्णासाहेब

  • देव मामलेदार यांनी श्रीमहाराजांना धाडिलेल्या एका पत्रांत 'परोप-

काराची आज्ञा झाली त्याप्रमाणे प्रारंभ केला आहे' अशा तऱ्हेचा मजकूर आहे. या पत्राची प्रत श्रीमहाराजांचे मठांत आहे.