पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'साक्षात्परिचय ' तर नांवच नको. मुळजी शेटच्या मुलावर त्यांचा फार लोभ होता, व त्याच्या आग्रहाकरितां एकदां ते मोटारमध्यें वसलेही परंतु तेव्हां देखील आमच्या इकडे मोटार तयार झाल्याखेरीज मोटारमध्यें बसणें वरें वाटत नाहीं, ' असे त्यांनी उद्गार काढले. ( २४२ 6 त्यांच्या आयुष्यासंबंधानें गोष्टी चालल्या असतां, ते असे म्हणाले की, 'अरे, मी भासक्याभुसक्या गोष्टीला हातच घातला नाही, आणि जे प्रयत्न झाले, तेही असे झाले कीं, आतां फक्त 'एकच पाऊल, ' की इकडचा डोंगर तिकडे; पण तें 'एकच पाऊल' पडूं देण्याची महाराजांची इच्छा नव्हती. आणि दर वेळेस तें 'एकच पाऊल' सोडून द्यावें लागत असे. परंतु कांहीं मनुष्यकृत अडचणींमुळे नव्हे हो. दर वेळेला, ज्याच्यावर ते पाऊल टाकणें अवलंबून असे, असा मनुष्यच अचूक मरून जात असे. अशा रीतीनें मध्य- शिलाच ढळून गेल्यामुळे सारी उभारणी वाया जाई. " अण्णासाहेब यांना महाराजांनीही ' हे लष्करी खातें आहे, ' ' याच्याकडे इकडचा डोंगर तिकडे करण्याचें काम आहे, ' ' हा कृतयुगींचा कंटक आहे' असे नेहमी म्हणावें त्या प्रसंगांना उद्देशून हें भाषण होतें. त्यावर त्यांना विचारले कीं, 'एकच पाऊल ' जर पडले असते, तर काय झाले असतें ? तेंव्हां त्यांनी त्याचें थोडें वर्णन करून सांगितले कीं, 'अशी स्थिति म्हणजेच कृतयुग. कृतयुग काय आणखी वेगळे असतें ? ' त्यावर 'शिवाजी महाराजांत आणि यांत काय फरक झाला असतां ? " तर तसेंच काम झालें असतें !' असे विचारल्या- वरून ते म्हणाले ‘अरे हो. पण तशी महाराजांची इच्छा नव्हती; ' तेव्हां अर्थातच ' महाराजांची तरी पण अशी इच्छा कां नसावी' असा प्रश्न आला. तेव्हां ते म्हणाले ‘अरे ते बरोबर आहे. ते कितीही झाले असतें तरी व्यक्ति- विषयक व एकट्याचें झाले असतें, आणि म्हणून जास्त टिकलेंही पण नसतें. म्हणून सांधा वळवून गाडी या रुळावर घातली. आतां होईल तें खरें व पकें काम होईल. " या शब्दांचे अर्थ व महत्त्व पुरें समजण्याची कांहीं आमची ताकद नाहीं. परंतु त्यांतून एक बोध उमटून पडतो कीं, एकट्याकरितां म्हणून होणाऱ्या गोष्टींचा त्याग करण्याची त्यांची मजल वर गेली होती. शिवाजी महाराजांचें नांव यांत आले म्हणून चिचकून जावयाचेही काहीं कारण नाही. हे चरित्र फारच त्रोटक आहे, आणि गायत्रीप्रमाणे, अनेक