पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोकनायकत्वाची खूण. २४१ बुद्धि असलेले निदान त्या वेळीं तरी त्यांच्याभोंवतीं कोणी नव्हते. त्यामुळे एकाद्या अरण्यामध्यें दिव्य गायन होऊन, जसें तें अवकाशांत विलीन व्हावें, असाच जवळ जवळ हा प्रकार झाला. परंतु असे जरी असले तरी, आनंदाची गोष्ट अशी आहे की हें गायन जिवंत वाणीचे होतें, आणि त्या अरण्यांतील वृक्षपाषाणाला ही बसलेली त्याची भावना कधीं वाया जावयाची नाहीं; आज नाहीं उद्यां ते वृक्षपाषाणच सजीव होऊन सूर काहूं लागतील, असा भावार्थ त्यांच्या स्वतःच्या बोलण्यांत नेहमी येत असे. असो. लोकनायकत्वाचें लक्षण एकेठिकाणी मोठ्या उत्कृष्ट रीतीनें असे सांगितलें आहे कीं, The real test of & leader lies in holding widely different people together, along the line of there common sympathies, and this can only be done unconsciously, never by trying. (Sister Nivedita ). अशा प्रकारची विषम समता आणि सर्वांविषयों एकजात जिवंत कळवळा ह्यांच्या योगानें ते अनाथ सनाथांचे माहेर होऊन राहिले. व्यक्तिकल्पनेचा धिःकार आणि सर्वांकरितां सर्व व सर्वामिळती आपण ही कल्पना नुसत्या बोलण्यांत अगर खाण्यापिण्यासारखा उपभोग घेण्याच्या बाबतींतच नव्हे, तर शरीरक्लेशाच्या बाबतीतही अगदी बारीकसारीक गोष्टीं- • पासून प्रमुख होती. धुळ्याच्या प्रवासाचें मागें वर्णन दिलेच आहे. त्यांना सेकंडक्लासमधून जाण्याची म्हणजे ऐपत नव्हती असें नाहीं, व त्याप्रमाणे पुष्कळ आग्रहही करण्यांत येत असे. परंतु त्यांचें आपलें एक उत्तर ठरलेलें असे; “ जाऊं तर सगळेच सेकंडमधून जाऊं, नाहीं तर आपला तिसरा वर्गच बरा. " आळंदीस जातांनाही असेंच व्हावयाचें, अगदीं तरुण व होतकरू मंडळीस पायीं जाण्यांत आनंद वाटे, आणि पुणें व आळंदी म्हणजे घर- आंगणासारखेच म्हणून त्यांचीही त्यांना तसे पाठविण्यास हरकत नसे. त्यांना स्वतःला अनंत व्यापांमुळे लौकर निघावयास वेळ मिळत नसे, आणि आळं- दीस वेळेवर पोहोचण्याकरितां तांगा वा लागे. परंतु स्वतः त्यांना मार्गे उरलेली मंडळी बरोबर घेऊन बैलगाडींतून जाणे अतिशय आवडे. मोटारचें , १६