Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हताशता नव्हे स्वार्थत्याग. २४३ शापांनीं बाधित आहे, तथापि त्यांच्या अनेकमुखी खटाटोपांची पुष्कळशी विस्तृत माहिती असणारे अजूनही पुण्यांत कोणी नाहींत असें नाहीं. आणि त्या गोष्टी जरी सोडल्या, व केवळ वऱ्हाडचें कारस्थान घेतले, तरीही कोणासही यांत कांहीं अतिशयोक्ति आहे, असें वाटणार नाहीं. श्रीसयाजीराव गायकवाडां- सारख्या माणसाच्या हाती सत्ता आली आणि त्याला जर सदिच्छा असली, तर काय करतां येतें, हें वडोदा संस्थानावरून कोणाच्याही लक्षांत येतें. वऱ्हाडसारखा सुपीक व संपन्न मुलूख, पैशाचा सावकारी पेंच, अण्णासाहेबां• सारख्या लोकोत्तर पुरुषाचें नेतृत्व, कमालीची निरपेक्षता, केवळ लोककल्याणा- चाच जिव्हाळा, समतोल वागणूक, अविश्रांत उद्योग, आणि परदेशांतील कॉन्सल्स वगैरेंसारख्या जबाबदार व महत्त्वाच्या राजपुरुषांशी असलेले त्यांचें हितगुज या सर्वांचा विचार केला, तर जें कांहीं महापुरुषांनी मोठ्या प्रमाणांत जर्मनींत करून दाखविलें, त्याचाच प्रयोग लहान प्रमाणावर येथें करता आला नसता, असे कसे म्हणावें ? आतां इतकें सर्वही ' किती झाले तरी एकट्याचेंच ' कसें झालें असतें, तें समजणे आमच्या शक्तीच्या बाहेर आहे, परंतु त्यापासून दोन गोष्टी उघड होतात कीं, सालरजंगाच्या मृत्यूनें हताश होऊन अण्णासाहेब ' श्रीविठ्ठल ' श्रीविठ्ठल' करूं लागले, असे नसून आपल्या ध्येयाच्या पाहिजे तशा सिद्धी- करितां त्यांनी जाणूनबुजून केलेला प्रचंड स्वार्थत्याग आहे, आणि पूर्वी आम्हीं एका प्रकरणांत म्हटल्याप्रमाणें मनुष्यहानीनें नव्हे, तर कांहीं तरी अतिमानुष ज्ञानामुळे त्यांच्या गाडीचा सांधा बदलला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या ठिकाणीं दुःखशोकाचा लवलेशही नसून, उलट अतिशय उत्साह, आणि अतिशय आशावादित्व होतें. एकदां ' आपण परमार्थांत पुष्कळ परिश्रम केले आहेत' असे समजणाया आणि गिरनारप्रभूच्या कृपेमुळे थोडीबहुत कांहीं सिद्धी असलेल्या एका माणसा- विषयीं बोलणें चाललें होतें. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याविषयी आणि भविष्या- विषयीं बोलत असतां, तो असें म्हणाला कीं, 'तें काय व्हावयाचे आहे, तें तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर आपली पात्रता दाखविली नाही, तर संधी निघून जाईल. तें काय व्हावयाचे आहे, म्हणजे तुमची पात्रता सिद्ध होऊन तुम्हीं वर येणार का संधी बांया जाऊन नामशेष होणार हे अजून