पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० 'साक्षात्परिचय' रीतीनेंच जरी त्या सर्वांविषयी त्यांच्या पोटांत सारखाच कळवळा असला तरी आवड व लोभ हे त्या त्या मानानें कमीं अधिक असतील, हे उघड आहे. परंतु त्यांनी कधी स्वतः तसें यत्किंचित् देखील कोणाच्या नजरेस येऊं दिलें नाही, आणि ‘ यांचें प्रेम आपल्या एकट्यावरच जास्त आहे,' असा अभिमान, अथवा याच्या उलट 'आपल्या गुणहीनतेमुळे आपल्यावर यांचा लोभ नाही ' असे दैन्य कोणाच्याही अंतःकरणांत उत्पन्न होऊं नये, अशी त्यांच्या वाग- ण्याची हातोटी होती. तेवढ्याकरितां प्रत्येक माणसाशी त्यांचा कांहीं विशेष प्रकारचा संबंध असे, व कसाही मनुष्य असला तरी त्या विशेषापुरता इतर कोणापेक्षांही त्या माणसाचा अधिक आदर करून ते सर्व माणसांच्या संबंधांत सारखेपणा राखीत. पहिल्यापासूनच त्यांच्या स्वभावामध्ये एक प्रकारचा विल- क्षण एकमार्गीपणा होता. 6 एकदां कोणतीही गोष्ट त्यांच्या क्रमांत पडली, कीं वज्रलेप झाली म्हणून समजावें. केवळ यदृच्छेनेंच ती सुटून जाईल तेव्हां जाईल. त्यामुळे अगदी बारीक सारीक गोष्टींपासूनही त्यांचे धारे ठरलेले असत. गणपतीनेंच धुतलें पाहिजे. आणि दुसऱ्या कोणी कितीही केले, तरी तें त्यास धुवावयास द्याव याचें नाहीं. असे प्रत्येक बाबतींत सहज ठरून गेलेले असे. त्यामुळे प्रत्येकाला थोडेबहुत त्यांच्या अगदीं निकट यावयास सांपडे, व त्या निकट येण्याच्या फाजील फायदा घेणे शक्य नसे. कारण तो मनुष्य कितीही योग्य व लोभां- तला असला, तरी तेवढी बाजू संपली की लागलेच अंगावाहेर टाकला जात असे. तेव्हां प्रत्यक्ष पाहिले तर त्यांच्या लोभांत आपण अधिक आहों, असें कोणास म्हणण्यास जागा नव्हती. परंतु प्रत्येकास त्यांच्याशी वाटेल तें हित- गुज करून घेतां येत असल्याकारणानें, आणि प्रत्येकाच्या योगक्षेमाची चिंता ते सार- खीच वाहतांना दिसत असल्यामुळे त्यांच्या सहवासाचा आनंद आपल्या अंत:- करणांत प्रत्येकास सारखाच घेतां येई. श्रीमन्महाराजांनी आपल्या ग्रंथांत म्हट- ल्याप्रमाणें जो 'आप्त ' आहे त्याला ' विषमभाव' धरावाच लागतो, आणि यांच्या भोंवतीं तर सर्व प्रकारची अद्भुत विषमता होती. परंतु अशा प्रकारांनी त्यांत समता उत्पन्न करून, ही दोरीवरील कसरत त्यांनी करून दाखविली. परंतु दुःखाची गोष्ट एवढीच कीं, समता शब्दाचा हा त्यांनी प्रत्यक्ष आचरून दाखविलेला अर्थ समजण्यास व त्यांचे कौतुक पाहण्यास योग्य अशी प्रौढ ●