Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या आचरणाचें सार. २३९ हाताच्या पाठीनें दुसन्यास टोकीत असलेली त्यांची मूर्ति डोळ्यासमोर आली, व ज्याच्यांत तासचे तासही चुटकी सारखे निघून जात, असे त्यांचें तें बहु- रंगी भाषण आठवले म्हणजे त्याचा ' पुंडलीकवरदा ' व्हावा असे कोणास - वाटणार आहे ! परंतु तो मोह आवरलाच पाहिजे. कारण ‘ बोल- विता धनी ' जरी ' वेगळाच ' असला तरी ' कुठें चंचू ही अल्प पाखराची ' असेंच म्हणणें भाग आहे. तेव्हां तें किर्ताही उपयुक्त असले आणि मनोरंजक असले, तरीही तो मोह आवरलाच पाहिजे. म्हणून हात आखडता घेऊन त्यांच्या स्वभावांतील कांहीं ठळक विशेषांचें अगदीं त्रोटक वर्णन करून हा भाग संपवूं. C अपरिग्रह, दान, अवलोकन, स्वाभिमान, सरलता, वात्सल्य, समता, समदुःखिता, अशा त्यांच्या अनेक गुणांचें वर्णन तरी काय करावयाचें ? सौ० भागीरथीबाईनीं खरोखरच म्हटल्याप्रमाणे ' पटवर्धन गुण सिंधूचें । माहात्म्य थोर असे ॥ " परंतु त्याचप्रमाणे ' भागीरथीचें काव्य किती, म्हणून त्यांनी म्हटले आहे, तसाच दीनपणा मलाही माझ्या वाणीविषयीं वाटत असल्यामुळे, पुष्कळ हांव असूनही मनोमय समाधानच करून घेतली पाहिजे. मागील सर्व त्रोटक वर्णनावरून लक्षांत येईलच कीं यांच्या सर्व आचर- णाचें व स्वभावाचें सार म्हणजे एक प्रकारची विलक्षण समता व सर्वात्मता हैं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीच्या मुळाशी 'सर्वांकरितां सर्व ' . आणि ' सर्वांमिळतीं आपण' हे तत्व आढळून येई. आणि हेंच आपल्या भोवतालच्या जीवांच्या मनावर ठसावें, असा त्यांचा प्रयत्न असे. आणि तेवढ्या करितां त्याचा उच्चार हरप्रसंगानें दिवसांतून वाटेल तितके वेळां करण्यासही ते कंटाळत नसत; स्वतः तर अगदी क्षुल्लक गोष्टीपासूनही तसे वागून दाखवीत. एकव्याचे वैभव, एकटा उपभोग, फार तर काय, पण महाराजांची कृपा व प्रत्यक्ष एकट्याची मुक्ति, यांची देखील कोणी गोष्ट काढल्यास एकट्याची ? थू: थू: ' असें म्हणून ते त्याला अगदर्दी तिटकारून टाकीन. बाजारांत जाणें, शाळेत जाणे, देवदर्शनास जाणे, इत्यादि अगदी बारीक गोष्टीपासूनही एकट्या एकट्यानें एकादें काम केलेले त्यांना आवडत नसे. त्यांच्या जवळ सुष्ट पुष्ट, समर्थ दुर्बळ, भक्त अभक्त, अशा अनेक तऱ्हेची माणसें होतीं, व नैनार्गक 6