पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' साक्षात्परिचय ' २३८ अंगांतील अस्ताव्यस्त सदरा, डोक्यास उपरणें गुंडाळलेलें अगर काश्मिरी टोपी, अर्धीमुर्वी दाढी, आणि हातांतील जाड सोटा, अशी ही अवधूताची फेरी नित्य रात्री, वेळीं अवेळी, पुण्याच्या निरनिराळ्या भागांतून भर्रकन् जात असे. तेव्हां त्यांना पाहून कितीतरी लोकांना मौज वाटत असे, आणि कितीकांना तरी त्यांचा वचक बसे. रात्रींच्या वेळी सर्व निजानिज झाल्यावर, घरांतील कर्ता वडील माणूस जशी एकदां सान्या घरांत नजर टाकतो, त्याप्रमाणे हा पुण्यांतील वडील माणूस आपल्या आवडत्या शहरावर नीट नजर टाकून आणि सर्वांचें क्षेम आपल्या डोळ्यांनी पाहून, आणि ठिकठिकाणीं मनानें चिंतून, शांत चित्तानें व संतोषाने दोन घास खावयास बसे. आणि अशा रीतीनें एकदां दिवस पदरांत पडला की विश्रांतीकरितां आडवा होत असे. त्यांना झोंप लागती असे किंवा नाहीं कोण जाणे? त्यांनी पाय पसरलेले तर कधीं कोणी पाहिलेच नाहीत. परंतु तसेही कधीं म्हणजे जास्त पडले आहेत असे नाही. एकदा तास झाला नाहीं तोंच, त्यांचें 'हसं हसं * सुरू झालेलें ऐकूं यावयाचें. आडवे असले म्हणजे पुष्कळ वेळां चांगले घोरतांना ऐकूं येत परंतु ते कधीं खरोखरच निजत किंवा नाही, याची शंका आहे. एकदां तर त्यांनी स्वतः मलाच, ' मी नेहमी जागाच तर असतों, कधींच निजत नाहीं, ' असे सांगितलें होतें. अशा रीतीची त्यांची दिनचर्या आखलेली असे. यांत मग उदंड सृष्टि होई. व 'सपर्यापर्यायस्तव भवतु यन्मे विलसितम् ' (श्रीशंकरा- चार्यकृत सौंदर्यलहरी.) अशी त्यांची अखंड धारणा असल्यामुळे ती सारीही त्यांची उपासनाच चाले. त्यामुळे पुष्कळवेळां वोलल्यावर ' पुंडलीक वरदे हरि विठ्ठल !' असे म्हणून आपलें भाषण ते संपवीत. अशा रीतीनें वर्षानुवर्ष त्यांनी घालविलेल्या आयुष्यांतील एकेक गोष्ट आणि • प्रसंग सांगू लागले तर हजार पानेंही पुरावयाची नाहीत. विस्तृत मांडीवरील पोटाच्या घड्यांवर हालणारी पांढरी शुभ्र दाढी, आनंदी मुद्रा, सरल हास्य, दोन बोटांत तपकिरीची चिमटी धरलेली, आणि अनामिका व करांगुली वाळून मध्यमा उभारलेली अशी हस्तमुद्रा वरखाली करीत आणि मधून मधून

  • यांच्या म्हणण्यांतील कांहीं शब्दांवरून मंडळींनी गमतीनें त्या

म्हणण्याला हे नांव दिलें होतें.